Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

खरातचे ते कॉल, अजितदादांच्या मृत्यूशी कनेक्शन? दमानियांनी रेकॉर्ड समोर आणताच रोहित पवारांची फडणवीसांकडे मोठी मागणी

खरातचे ते कॉल, अजितदादांच्या मृत्यूशी कनेक्शन? 
दमानियांनी रेकॉर्ड समोर आणताच रोहित पवारांची फडणवीसांकडे मोठी मागणी

मुंबई : खरा पंचनामा 

अजित पवार यांच्या मृत्यूशी कनेक्शन सांगणारे अशोक खरात याचे अनेक कॉल रेकॉर्ड सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी समोर आणले आहेत. ज्या दिवशी अजित पवार यांचे निधन झाले, त्यादिवशी अशोक खरात याने वापरलेला फोन पुन्हा कधीच वापरला नाही, असे खळबळजनक आरोप दमानिया यांनी केला आहे.

तसेच खरात याच्या ५ फोनचे गौडबंगाल दमानिया यांनी समोर आणून अजित पवार यांच्या मृत्यू प्रकरणात त्याची चौकशी केली जावी, अशी मागणी अंजली दमानिया यांनी केली आहे.

अंजली दमानिया यांच्या आरोपांनंतर दादांच्या न्यायासाठी लढणाऱ्या रोहित पवार यांनीही त्यांच्या सूरात सूर मिसळत अशोक खरात याच्या चौकशीची मागणी केली आहे. अजित पवार यांच्या मृत्यूप्रकरणी तपास सुरू असताना रोहित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे विशेष मागणी केली आहे.

अजितदादांच्या अपघात प्रकरणात भोंदू खरातचे कनेक्शन समोर येत असून, 'त्या' सहा दिवसांत खरातने चार फोन बदलले, तर एक फोन केवळ १९ मिनिटांचा कॉल करून बदलला. खरातच्या फोनवर सर्वाधिक कॉल अजितदादांच्या अपघाताच्या दिवशी झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.

अजितदादांचं अपघात प्रकरण अतिशय भयानक असून, या प्रकरणात CID कडे माहिती देऊनही कारवाई होत नाही. त्यामुळे तात्काळ CBI कडे हा तपास देणं गरजेचं आहे, अशी विनंती रोहित पवार यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली आहे. सीबीआयकडे तपास देण्यासंदर्भात सरकार त्वरित कार्यवाही करेल, ही अपेक्षा आहे. सरकारने आता जास्त उशीर करायला नको, अन्यथा हे संशयाचं धुकं अधिक गडद होईलच, शिवाय गुन्हेगार पुरावे सुद्धा दडपतील, असे रोहित पवार म्हणाले.

अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूच्याआधी सहा दिवसांत अशोक खरातने चार मोबाईल फोन बदलल्याची माहिती आहे. त्यामुळे अजित पवारांच्या मृत्यूचा संबंध खरातशी असल्याचा संशय व्यक्त करीत या प्रकरणात अशोक खरातची चौकशी करा, असे दमानिया म्हणाल्या. एआयच्या मदतीने ही धक्कादायक माहिती समोर आणल्याचे अंजली दमानिया यांनी सांगितले. अशोक खरात याने एक हँडसेट फक्त १९ मिनिटांसाठी वापरला, त्यानंतर तो लगोलग बदलल्याचाही दावा दमानिया यांनी केला आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.