Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

पतीसोबत अनैतिक संबंध, नगरसेविकेकडून महिलेचं अपहरण काँग्रेस नेत्यासह मुली अन् जावयावर गुन्हा

पतीसोबत अनैतिक संबंध, नगरसेविकेकडून महिलेचं अपहरण 
काँग्रेस नेत्यासह मुली अन् जावयावर गुन्हा 

मुंबई : खरा पंचनामा 

मुंबईच्या राजकीय वर्तुळातून एक अत्यंत खळबळजनक बातमी समोर आली आहे. भांडुपमधील काँग्रेसच्या ज्येष्ठ नगरसेविका आणि त्यांच्या कुटुंबावर भांडुप पोलीस ठाण्यात अपहरण, मारहाण आणि धमकावल्याप्रकरणी गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पतीसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून एका महिलेचं अपहरण करून तिला बेदम मारहाण केल्याचा गंभीर आरोप नगरसेविकेवर करण्यात आला आहे.

भांडुप प्रभाग क्रमांक ११० च्या काँग्रेस पक्षाच्या नगरसेविका आशा कोपरकर यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील सदस्यांवर हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. यामध्ये आशा कोपरकर (नगरसेविका), त्यांच्या दोन मुली, जावई, मुलगा आणि त्यांचा खासगी कार चालक यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आशा कोपरकर या भांडुपमधील काँग्रेस नेते सुरेश कोपरकर यांच्या पत्नी आहेत.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, काँग्रेस नेते सुरेश कोपरकर यांचं एका महिलेसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय नगरसेविका आशा कोपरकर आणि त्यांच्या कुटुंबीयांना होता. याच संशयातून संतापलेल्या कोपरकर कुटुंबाने त्या पीडित महिलेचे अपहरण केले. एवढ्यावरच न थांबता, कोपरकर कुटुंबीयांनी संबंधित महिलेला बेदम मारहाण केली आहे. तसेच त्यांनी जीवे मारण्याची धमकीही दिली, असा आरोप पीडित महिलेनं केला आहे.

या धक्कादायक प्रकारानंतर पीडित महिलेने थेट भांडुप पोलीस ठाणे गाठून कोपरकर कुटुंबीयांविरोधात तक्रार दिली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून नगरसेविका आशा कोपरकर, त्यांच्या दोन्ही मुली, जावई, मुलगा आणि चालकावर विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक झाली आहे की नाही, याबाबत अधिकृत माहिती मिळालेली नाही. भांडुप पोलीस या घटनेचा सखोल तपास करत असून पुढील तपास केला जात आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.