पोलिसांचा भयंकर घोळ!
चुकीचा गुन्हा दाखवून विकास लवांडे यांना अडकवलं
पुणे : खरा पंचनामा
पुणे पोलिसांच्या एका अजब कारवाईमुळे सध्या संपूर्ण महाराष्ट्रात मोठी खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांना पोलिसांनी एका अशा गुन्ह्यात अडकवले, ज्याच्याशी त्यांचा दूरदूरपर्यंत संबंध नव्हता. कोर्टात रिमांड रिपोर्ट सादर करताना चूक झाल्याची कबुली अखेर पोलिसांनी दिली आहे. या धक्कादायक प्रकारामुळे पुणे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर आता मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
विकास लवांडे यांनी "वारकरी संप्रदायाबाबत केलेल्या वक्तव्यामुळे धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करत पुण्याच्या वाघोली पोलीस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. याच प्रकरणात पोलिसांनी त्यांना अटक केली. विकास लवांडे यांना जामीन मिळू नये म्हणून वाघोली पोलिसांनी कोर्टात एक रिपोर्ट सादर केला. या रिपोर्टमध्ये लवांडे यांच्या नावावर जुने गुन्हे असल्याचे पोलिसांनी कोर्टाला सांगितले. पोलिसांनी 2017 मधील एका गुन्ह्याचा दाखला दिला.
2017 मध्ये लवांडे यांच्यावर राजकीय आंदोलनाचा एक गुन्हा होता, जो सरकारने 2022 मध्येच मागे घेतला होता. पोलिसांनी घाईगडबडीत त्या गुन्ह्याचा नंबर टाकण्याऐवजी भलताच गुन्ह्याचा नंबर टाकला. पोलिसांच्या या चुकीमुळे दारू पिऊन गोंधळ घातल्याचा हा गुन्हा थेट विकास लवांडे यांच्या नावावर टाकला.
पोलिसांची चूक पाहून कोर्टाने लवांडे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. मात्र, नंतर पोलिसांना आपली चूक समजली आणि त्यांनी कोर्टात मान्य केले की, "हा प्रकार नजरचुकीने झाला आहे."
एका मोठ्या राजकीय पक्षाच्या प्रवक्त्याला अशा प्रकारे चुकीची माहिती देऊन आणि न केला गुन्हा त्यांच्या नावे लिहिल्यामुळे वाघोली पोलिसांवर आता चौफेर टीका होत आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.