पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यात सुरक्षा त्रुटी, उपनिरीक्षकासह सहा पोलिस अधिकारी निलंबित
बंगळूरू : खरा पंचनामा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 10 मे रोजी बंगळुरूमधील आर्ट ऑफ लिव्हिंग (AOL) फाउंडेशनच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या सुरक्षा त्रुटीप्रकरणी उपनिरीक्षकासह सहा पोलिस अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. पंतप्रधानांच्या मार्गालगत स्फोटक साहित्य आढळून आल्याच्या घटनेनंतर ही कारवाई करण्यात आली.
बंगळुरू दक्षिण विभागाचे पोलिस अधीक्षक आर. श्रीनिवास गौडा यांनी निलंबनाचे आदेश दिले असून संबंधित अधिकाऱ्यांची नावे जाहीर करण्यात आलेली नाहीत.
पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्याच्या मार्गावरील आर्ट ऑफ लिव्हिंग केंद्रापासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या कुप्पारेड्डी केरे परिसरात संशयास्पद साहित्य आढळून आले होते. एका खासगी मालमत्तेच्या कंपाउंड भिंतीजवळ, मुख्य रस्त्यापासून सुमारे 25 फूट अंतरावर ठेवलेल्या पुठ्ठ्याच्या बॉक्समध्ये दोन जिलेटिन कांड्या, काडेपेटी, कापूर, बॅटऱ्या, तारा, रिअल-टाइम क्लॉक आणि एलसीडी डिस्प्ले आढळले होते.
या प्रकरणाचा तपास सुरू असून अद्याप पोलिसांना कोणताही ठोस धागादोरा मिळालेला नाही. सुरुवातीला पोलिसांनी बॉक्समध्ये दोन जिलेटिनच्या दोन कांड्या आणि काडेपेटी असल्याची माहिती दिली होती. मात्र काही दिवसांनंतर राष्ट्रीय तपास संस्था (NIA) ने माहिती गोळा केल्यानंतर बॉक्समधील इतर इलेक्ट्रॉनिक साहित्याचाही तपशील समोर आला.
तपासासाठी पोलिसांनी तामिळनाडू, आंध्र प्रदेश तसेच कर्नाटकातील शेजारील जिल्ह्यांमध्ये पथके पाठवली होती. एनआयए आणि गुप्तचर विभागाच्या (IB) अधिकाऱ्यांनीही घटनास्थळाची पाहणी करून आवश्यक माहिती संकलित केली.
दरम्यान, फॉरेन्सिक अहवालात या साहित्यामुळे तत्काळ धोका दरम्यान, फॉरेन्सिक अहवालात या साहित्यामुळे तत्काळ धोका नसल्याचे नमूद करण्यात आले आहे. अहवालानुसार, सापडलेल्या जिलेटिन कांड्या सुमारे तीन वर्षे जुन्या होत्या, टाइमर निकामी अवस्थेत होता आणि बॉक्समध्ये डेटोनेटरही नव्हता. त्यामुळे प्रत्यक्ष स्फोट घडवून आणण्याची क्षमता या साहित्यामध्ये नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.