Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

सरन्यायाधीशांनी 'झुरळ' म्हटलं अन् मराठी तरुणाने थेट पक्षच काढला!

सरन्यायाधीशांनी 'झुरळ' म्हटलं अन् मराठी तरुणाने थेट पक्षच काढला!

मुंबई : खरा पंचनामा 

काही बेरोजगार तरुण झुरळांसारखे असतात, जे नंतर मीडिया, सोशल मीडिया किंवा आरटीआय कार्यकर्ते बनतात आणि व्यवस्थेवर हल्ला करू लागतात..." सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या याच एका कथित विधानाने इंटरनेटवर असा काही 'राडा' केला की, संतापलेल्या तरुणांनी थेट डिजिटल बंड पुकारलं आणि सोशल मीडियावर रातोरात एक नवीन पक्ष उभा राहिला नाव काय तर, 'कॉकरोच जनता पार्टी' (CJP). ऐकायला जरी हे नाव एखाद्या गमतीशीर मीम सारखं वाटत असलं, तरी हा पक्ष डिजिटली लाँच झाल्यानंतर अवघ्या काही तासांत तब्बल 70 हजारांपेक्षा जास्त तरुण जोडले गेले आहेत. विशेष म्हणजे या पक्षाने त्यांचा जाहीरनामाही प्रकाशित केला आहे. जो वाचून मोठे मोठे नेतेही चक्रावले आहेत.

आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, आधीच देशात ढीगानं पक्ष आहेत त्यात आता हा नवा पक्ष कशाला तर, जरा थांबा. हा पक्ष निवडणूक लढवण्यासाठी नाही, तर सिस्टीमची जिरवण्यासाठी बनवला गेला आहे. याचा श्रीगणेशा झाला ती, सरन्यायाधी सूर्य कांत यांनी केलेल्या 'झुरळ' वाल्या टिप्पणीने. सरन्यायाधीशांची ही टीका सोशल मीडियावर अक्षरक्षः वणव्यासारखी पसरली आणि तरुणांचा राग अनावर झाला. वाद वाढल्यानंतर सरन्यायाधीशांनी यावर स्पष्टीकरणही दिलं की, "माझी ती टिप्पणी बनावट पदव्यांच्या जोरावर कायदा आणि मीडियासारख्या क्षेत्रात बेकायदेशीरपणे घुसणाऱ्यांसाठी होती, देशातल्या प्रामाणिक बेरोजगार तरुणांसाठी नाही. "पण म्हणतात ना, कमानीतून सुटलेला तीर आणि तोंडातून गेलेला शब्द परत येत नाही याच मुद्द्याचा धागा पकडत एका मराठी तरुणाने या संतापाचे रूपांतर एका अनोख्या आंदोलनात केले.

या सॅटायरिकल म्हणजेच उपरोधिक पक्षाची स्थापना अभिजीत डिपके या मराठी तरुणाने केली आहे. 16 मे रोजी त्यांनी 'X' (ट्विटर) वरून या पक्षाची घोषणा केली. अभिजीत यांनी पुण्यातून पत्रकारितेची पदवी घेतली त्यानंतर अभिजीत सध्या अमेरिकेतील नामांकित 'बॉस्टन युनिव्हर्सिटी' मधून 'पब्लिक रिलेशन्स' (PR) या विषयात मास्टर्स करत असल्याचे टाईम्स ऑफ इंडियाने त्यांच्या वृत्तात म्हटले आहे. 2020 ते 2023 या काळात अभिजीतने 'आम आदमी पार्टी'च्या सोशल मीडिया टीममध्ये काम केले आहे. त्यामुळे सोशल मीडियाचा पल्स त्यांना चांगला ठाऊक आहे. "भारतासारख्या लोकशाहीत, जिथे सुप्रीम कोर्टाला संविधानाचा रक्षक मानले जाते, तिथे तरुणांचा असा अपमान करणे स्वीकारार्ह नाही. जर सिस्टीमपर्यंत आवाज पोहोचवण्यासाठी आम्हाला 'झुरळ' व्हावं लागत असेल, तर आम्हाला या ओळखीचा अभिमान आहे असे अभिजीत यांचं म्हणणं आहे.

आता अल्पावधित लोकप्रिय झालेल्या या पक्षाचा सदस्य होण्यासाठी अनेक तरूण इच्छूक आहेत. पण, पक्षात सामील होण्यासाठी काही 'विशेष पात्रता' असणे गरजेचे आहेत. ज्यात तुम्ही अधिकृतपणे बेरोजगार असले पाहिजे. भयंकर आळशी असणं गरजेचं असून, 24 तास ऑनलाईन राहण्याचं आणि स्क्रोल करण्याचं कडक व्यसन तुम्हाला आवश्य आहे. त्याशिवाय प्रोफेशनल पद्धतीने सिस्टीमवर आपला राग काढण्याची धमक तुमच्यात असली पाहिजे.

या डिजिटल आंदोलनाने देशातील मोठ्या राजकीय नेत्यांचेही लक्ष वेधून घेतले आहे. TMC खासदार महुआ मोइत्रा आणि कीर्ती आझाद यांच्यासारख्या बड्या नेत्यांनीही यावर मजेशीर प्रतिक्रिया देत या पक्षात सामील होण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.