NEET पेपरफुटी प्रकरण : सीबीआयचे नागपूर अन् ब्रह्मपुरीत ३ विद्यार्थ्यांच्या घरांवर छापे
नागपूर : खरा पंचनामा
देशभरात गाजत असलेल्या 'नीट' पेपरफुटी प्रकरणात मंगळवारी केंद्रीय गुन्हे अन्वेषण निभागाच्या पथकाने तीन विद्यार्थ्यांच्या घरी झाडाझडती घेतली. यात नागपुरातील दोन विद्यार्थीनीसह चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यातील एका विद्यार्थ्याचा समावेश आहे.
निटच्या जीवशास्त्र आणि रसायनशास्त्राचे पेपर फुटल्या प्रकरणात सीबीआयच्या नवी दिल्ली येथील आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात सीबीआयने आधीच लातूरमधील 'आरसीसी क्लासेस' या शिकवणी वर्गाचे संचालक प्रा. शिवराज मोटेगावकर याला सोमवारी तााब्यात घेतले आहे.
दरम्यान केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाला पथकाला नागपुरातील काही विद्यार्थ्यांच्या भ्रमणध्वी क्रमांकाची माहिती मिळाली होती. त्या आधारे नवी दिल्लीतील पथकाने नागपुरातील पथकाच्या सहकार्याने नागपुरात शोध मोहीम राबवली. यात नागपुरातील दोन विद्यार्थीनिंसह चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यातील एका विद्यार्थ्याच्या घरी पथकाने झाडाझडती घेत कागदपत्रे आणि काही नोट्स ताब्यात घेतल्या. त्या नोट्स आणि फुटलेल्या पेपरमध्ये काही साधर्म्य आहे का हे सीबीआयीची टीम पडताळून पहात आहे.
नीट पेपरफूट घोटाळ्यात किमान एक हजार विद्यार्थ्यांनी हा पेपर खरेदी केल्याचा दाट संशय सीबीआयला आहे. त्यापैकी तीन विद्यार्थ्यांनी खरेदी केलेले पेपर हेच होते का, त्यांनी ते इतरांना पाठवले होते, का याचीही सीबीआयची टीम चौकशी करत आहे.
या घडामोडीत सीबीआयची पथके देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी शोध मोहीम राबवत आहे. त्यापैकी एक शोध मोहीम नागपूर आणि चंद्रपुरात राबवण्यात आली. विदर्भातील तीन विद्यार्थ्यांनी देखील हे पेपर खरेदी केल्याचा संशय सीबीआयला असून त्या दिशेने तपास केला जात आहे. मात्र पेपर फुटीचे केंद्र तुर्तास नागपूर नाही, असे सीबीआयमधील सुत्रांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.