गांजा विक्री करणाऱ्या एकाला तासगावमध्ये अटक
दीड किलो गांजासह दुचाकी जप्त : सांगली एलसीबीची कारवाई
सांगली : खरा पंचनामा
तासगाव येथे गांजा विक्री करणाऱ्या एकाला अटक करण्यात आली. त्याच्याकडून दीड किलो गांजा, दुचाकी जप्त करण्यात आल्याची माहिती एलसीबीचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनी दिली.
रोहित राजू जाधव (वय २४, रा. एम. एस. ई. बी. पाठीमागे, सिध्देश्वर कॉलनी, तासगाव) असे अटक केलेल्याचे नाव आहे. पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर अधीक्षक कल्पना बारवकर यांनी अंमली पदार्थ विक्री, साठा, तस्करी करणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना एलसीबीला दिल्या आहेत. त्यानुसार निरीक्षक झाडे यांनी सहायक निरीक्षक राजेंद्र यादव यांचे पथक तयार केले होते.
पथक तासगाव शहरात गस्त घालत असताना शहरातील कापूर ओढा येथील स्मशानभूमिजवळ एकजण गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली. पथकाने तेथे जाऊन जाधव याला ताब्यात घेतले. त्याच्या पिशवीची झडती घेतल्यावर त्यामध्ये दीड किलो गांजा सापडला. तो आणि दुचाकी जप्त करून त्याला अटक करण्यात आली. त्याला तासगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर अधीक्षक कल्पना बारवकर, एलसीबीचे निरीक्षक संजीव झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक राजेंद्र यादव, सपाना गराडे, सागर टिंगरे, सागर लवटे, सतिश माने, अतुल माने, अमर नरळे, संदीप गुरव, संदीप नलावडे, उदय माळी, प्रकाश पाटील, अमीर फकीर, अरुण पाटील, अभिजीत गायकवाड, विक्रम खोत, सूरज थोरात, केरुबा चव्हाण, रणजित जाधव, मोतीराम खोत, शिवाजी शिद, सायबर पोलीस ठाण्याचे कॅप्टन गुंडवाडे, विजय पाटणकर, अजय पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.