Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

पुण्यात मृत्यूचे तांडव : मुख्यमंत्री अॅक्शन मोडवर, पोलिसांना थेट आदेश

पुण्यात मृत्यूचे तांडव : मुख्यमंत्री अॅक्शन मोडवर, पोलिसांना थेट आदेश

पुणे : खरा पंचनामा 

पुणे आणि पिंपरी चिंचवड हादरून गेलं आहे. या दोन्ही शहरात विषारी दारूमुळे हाहाकार माझला आहे. एकामागून एक 14 लोकांचा या दारूमुळे मृत्यू झाल्याने सर्वच हादरून गेले आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे आनंदवन, काटेवस्ती, संजयनगर, आझाद चौक आणि जय महाराष्ट्र चौक परिसरावर शोककळा पसरली आहे. आतापर्यंत आठ जणांचा मृत्यू झाला असून अनेक कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत.

प्राथमिक तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, ही विषारी स्पिरिटमिश्रित दारू योगेश वानखेडे याने तयार केली होती. ही दारू पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील विविध भागांत विक्रीसाठी पुरवण्यात आली होती. दापोडी, फुगेवाडी, हडपसर आणि काळेपडळ परिसरातील अनेकांनी ही दारू सेवन केल्यानंतर त्यांना तोंडाला फेस येणे, प्रकृती बिघडणे अशी लक्षणे दिसून आली आणि काही जणांचा मृत्यू झाला. योगेश वानखेडे हा सराईत अवैध दारू विक्रेता असून, यापूर्वीही त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी त्याला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

या दुर्घटनेमुळे अनेक कुटुंबांचा आधार हिरावला गेला आहे. मृतांमध्ये राठोड कुटुंबातील दोन सख्खे भाऊ विजय राठोड आणि राजेंद्र राठोड यांचा समावेश आहे. दोन तरुण मुलांच्या निधनाने त्यांच्या वडिलांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. याशिवाय, सुतारकाम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारे ४४ वर्षीय बाबा शेख यांचे निधन झाल्याने त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. इलेक्ट्रिशियन म्हणून काम करणारे ५२ वर्षीय अकबर पठाण यांच्या मृत्यूमुळे त्यांची एकुलती एक मुलगी पोरकी झाली आहे. दरम्यान, राजेश राजपूत, पांडुरंग फुगे, आनंद निकाळजे आणि आनंद देसाई यांच्यासह मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या घटनेमुळे परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

पुणे आणि पिंपरी चिंचवड हादरून गेलं आहे. या दोन्ही शहरात विषारी दारूमुळे हाहाकार माझला आहे. एकामागून एक 14 लोकांचा या दारूमुळे मृत्यू झाल्याने सर्वच हादरून गेले आहेत.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.