Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

साडेतीन वर्षांच्या मुलीच्या हत्येनंतर मुख्यमंत्री आक्रमकपोलीस अधिक्षकांना दिले कडक आदेश

साडेतीन वर्षांच्या मुलीच्या हत्येनंतर मुख्यमंत्री आक्रमक
पोलीस अधिक्षकांना दिले कडक आदेश

मुंबई : खरा पंचनामा 

पुण्यातील भोर येथे साडेतीन वर्षांच्या चिमुरडीवर ६५ वर्षांच्या नराधमाने बलात्कार करून तिची हत्या केली. ही घटना अत्यंत निंदनीय आणि क्लेशदायक असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

या क्रूर कृत्यामुळे समाजात तीव्र संताप व्यक्त होत आहे. आरोपीला अटक करण्यात आली असून त्याचे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे जुने संदर्भही समोर येत आहेत. या घटनेमुळे पीडित मुलगी आणि तिच्या कुटुंबाबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे असेही ते म्हणाले.

आरोपीला पोलिसांनी अटक केलीच आहे, मात्र आता हे संपूर्ण प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात चालवण्यासाठी आम्ही न्यायालयाला विशेष विनंती करणार आहोत. या नराधमाला कमीत कमी वेळात मृत्यूदंडाची शिक्षा मिळावी, हीच आमची न्यायालयाकडे आग्रही मागणी असेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विश्वास व्यक्त केला. या प्रकरणी कठोर कारवाईचे आदेश पुणे ग्रामीण अधिक्षकांना दिल्याचेही यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

या प्रकरानंतर विरोधकांकडून महाराष्ट्र आणि येथील महिला असुरक्षित असल्याचा आरोप केला जात आहे. यावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, प्रत्येक घटनेत राजकारण शोधणे यापेक्षा दुर्दैवी काहीही असू शकत नाही. काही बाबतीत संवेदनशीलता बाळगणे आवश्यक असते. विरोधक त्यांचे काम करतील, परंतु राज्य सरकार जे करणे आवश्यक आहे ते सर्व ठोस पावले नक्कीच उचलेल.

चिमुरडीच्या हत्येच्या निषेधार्थ आज नसरापूर कडकडीत बंद आहे. गावकऱ्यांनी 'मुका मोर्चा' काढला होता. प्रशासनाच्या आश्वासनानंतर गावकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले. पण परिसरात तणावपूर्ण शांतता आहे. गावकऱ्यांचे शिष्टमंडळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री सुमित्रा पवार यांची भेट घेणार आहे. नसरापूर अत्याचार प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेत पोलीस अधीक्षक संदीप गिल यांना कडक कारवाईचे आदेश दिले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर तपासाला वेग आला असून नराधमाला कठोर शिक्षा करण्याची गावकऱ्यांनी मागणी केली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.