मुंबई-पुणे मिसिंग लिंक : पुण्याच्या दिशेने जाणारी मार्गिका अद्यापही बंद; दुपारी वाहतुकीसाठी खुली होण्याची शक्यता
मुंबई : खरा पंचनामा
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील मिसिंग लिंकच्या लोकार्पणानंतर काही तासाने मिसिंग लिंक वाहतुकीसाठी खुली होईल असे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) जाहीर करण्यात आले होते.
लोकार्पणानंतर काही वेळातच मुंबई-पुणे मार्गिका खुली करण्यात आली असून प्रवाशांना दिलासा मिळाला. मात्र पुणे-मुंबई मार्गिका अद्याही खुली झाली नसल्याने प्रवाशांमध्ये नाराजी आहे. शुक्रवारी लोकार्पणाच्या दिवशी प्रवाशांना वाहतूक कोडींचा सामना करावा लागला, तासनतास वाहतूक कोंडीत अडकून रहावे लागले. मिसिंग लिंक खुली झाल्यानंतर वाहतूक कोंडीतून मुक्तता होईल असे वाटत असताना अद्यापही मिसिंग लिंकवरी पुणे-मुंबई मार्गिका खुली न झाल्याने प्रवाशांची नाराजी वाढत आहे.
एमएसआरडीसीकडून खोपोली ते कुसगाव अशी १३.३ किमीची नवीन मार्गिका अर्थात मिसिंग लिंक बांधण्यात आली. मिसिंग लिंकचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुक्रवारी दुपारी १ च्या सुमारास झाले. लोकार्पणानंतर तात्काळ मुंबई-पुणे मार्गिका वाहतुकीसाठी खुली करून वाहतूक कोंडीत अडकलेल्या वाहनचालक-प्रवाशांना दिलासा देण्यात आला. तर पुणे-मुंबई मार्गिकेवर लोकार्पणाच्या कार्यक्रमासाठी मंडप घालण्यात आला होता. या मंडप काढून मार्गिका रिकामी करण्यासाठी लागणारा वेळ लक्षात घेता एमएसआरडीसी आणि वाहतूक पोलिसांनी सायंकाळी ६ पर्यंत मार्गिका खुली केली जाईल असे सांगितले होते. मात्र शुक्रवारी सायंकाळी ६ वाजता मार्गिका खुली झालीच नाही, पण शनिवार उजाडला तरी प्रवाशांना, वाहनचालकांना मार्गिका खुली होण्याची प्रतीक्षा करावी लागत आहे. त्यामुळे नाराजी वाढत आहे.
पुणे-मुंबई मार्गिका अद्याप खुली झालेली नाही. मागील दोन-चार दिवसाने सोहळ्याच्या कार्यक्रमाच्या तयारीचे काम सुरू होते. कामगार थकल्याने रात्री मंडप काढण्याचे काम पूर्ण होऊ शकले नाही. मात्र आता सकाळपासून कामास सुरुवात झाली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.