Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

मुंबईतील पोलीस उपनिरीक्षकावर पुण्यात बलात्काराचा गुन्हा

मुंबईतील पोलीस उपनिरीक्षकावर पुण्यात बलात्काराचा गुन्हा

पुणे : खरा पंचनामा 

स्पर्धा परीक्षेची तयारी करताना तरुणीशी झालेली मैत्री, तसेच पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झाल्यानंतर तरुणीस विवाहास नकार देऊन तिची फसवणूक, तसेच बलात्कार केल्या प्रकरणी मुंबईतील एका पोलीस उपनिरीक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत एका तरुणीने वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तिने दिलेल्या फिर्यादीनुसार, पोलीस उपनिरीक्षक तरुणाविरुद्ध फसवणूक, तसेच बलात्कार केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडीत तरुणी आणि आरोपी पोलीस उपनिरीक्षकाची ओळख झाली होती. तरुणी एका बँकेत नोकरी करत होती. स्पर्धा परीक्षेची तयारी ती करत होती. त्या वेळी तिची आरोपी तरुणाशी ओळख झाली. दोन वर्ष दोघे जण वारजे माळवाडी भागात एकत्र राहिले. त्याने तरुणीला विवाहाचे वचन दिले होते. तरुणी गर्भवती राहिल्यानंतर तेव्हा त्याने तिला गर्भपात करण्यास सांगितले.

तरुणाची नुकतीच पोलीस उपनिरीक्षक म्हणून निवड झाली. त्याची नेमणुक मुंबई पोलीस दलात झाली. सध्या तो कुरार पोलीस ठाण्यात नियुक्तीस आहे. पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झाल्यानंतर तरुणीने त्याच्याकडे विवाहाबाबत विचारणा केली. तेव्हा त्याने टाळाटाळ सुरू केली. मार्च महिन्यात त्याने विवाह करण्यास नकार दिला. त्यानंतर तिने नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. वारजे माळवाडी पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास करण्यात येत आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.