Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

संघटित गुन्हेगारी टोळ्यांची पाळेमुळे खणून काढणार!डार्क स्पॉटसह शहरी भागात व्हिजिबल पोलिसिंग दिसेल पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची माहिती

संघटित गुन्हेगारी टोळ्यांची पाळेमुळे खणून काढणार!
डार्क स्पॉटसह शहरी भागात व्हिजिबल पोलिसिंग दिसेल 
पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची माहिती 

सांगली : खरा पंचनामा 

सांगली जिल्ह्यात खु्नांची संख्या वाढल्याचे दिसून येते. खुनाच्या घटना वाढण्यामागे अनेक कारणे आहेत. सांगली, मिरज आणि कुपवाड शहरासह जिल्ह्यातील गुन्हेगारी टोळ्यांची पाळेमुळे खणून काढण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. डार्क स्पॉटसह शहरी भागात व्हिजिबल पोलिसिंग दिसेल अशी माहिती पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी 'खरा पंचनामा'शी बोलताना दिली.

अधीक्षक दोशी म्हणाले, जिल्ह्यात खु्नांची संख्या वाढली आहे. त्यामध्ये सराईत गुन्हेगारांकडून केले जाणाऱ्या गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील. जिल्ह्यात अन्य जिल्हे, राज्यातून उदरनिर्वाहासाठी आलेल्या कामगारांची संख्या अधिक आहे. या वाढलेल्या लोकसंख्येमुळेही काही प्रमाणात गुन्हे वाढण्याची शक्यता असते. तरीही जिल्हा पोलीस दलाकडून गुन्ह्यांना प्रतिबंध करण्याचे सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. 

गेल्या काही दिवसात महापालिका क्षेत्रातील डार्क स्पॉटची पाहणी केली आहे. त्या ठिकाणासह सर्व शहरातील गर्दीच्या ठिकाणी तसेच रात्री निर्जन ठिकाणी व्हिजिबल पोलिसिंगसाठी प्लॅनिंग सुरु आहे. खु्नांच्या घटना वाढण्यामागील कारणांचा अभ्यास सुरु असून शक्य असेल तेथील गुन्ह्यांना प्रतिबंध घालण्यासाठी प्रयत्नशील आहे, असेही अधीक्षक दोशी यांनी सांगितले.

गुन्हेगारी टोळ्यांचा बिमोड करण्यारोबरच त्या टोळ्यांची पिलावळही आमच्या रडारवर आहे. गुन्हेगार आणि गुन्हेगारी कारवाया यांचा आलेख कमी करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचा विश्वास अधीक्षक दोशी यांनी यावेळी व्यक्त केला.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.