रायगडावर शिवकाल पुन्हा उजळणार!
राजसदरेचे काचेतून होणार दर्शन
रायगड : खरा पंचनामा
स्वराज्यातील अभिमानाचा क्षण म्हणजे शिवराज्याभिषेक सोहळा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या याच राज्याभिषेकाशी नाते असलेले रायगड किल्ल्यावरील राजसदर म्हणजेच सिंहासन. हे राजसदर आणि राज्याभिषेक क्षेत्राच्या संवर्धनाला भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाने गती दिली आहे. त्यामुळे आता पारदर्शक काचेतून राजदरबाराच्या मूळ अधिष्ठानाचे दर्शन शिवप्रेमींना घेता येणार आहे. ऐतिहासिक पुरावे आणि मूळ वास्तुरचनेचा आधार घेत हे काम सुरू असून आगामी शिवराज्याभिषेक सोहळ्यापूर्वी ते पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
भारतीय पुरातत्त्व विभागाच्या माहितीनुसार, सिंहासन परिसराच्या जतनासाठी १९५३ मध्ये विशेष दुरुस्ती मोहीम राबविण्यात आली होती. त्या काळात राजसदर, आणि नगारखाना परिसरातील झाडीझुडपे हटवून मूळ वास्तूंचे अवशेष उजेडात आणण्यात आले.
सिंहासनाच्या मूळ दगडी अधिष्ठानाला धक्का न लावता सभोवती घडीव दगडांचे बांधकाम करण्यात आले होते. मजबुतीसाठी आरसीसी तुळ्या वापरून वरचा भाग विटा आणि सिमेंटमध्ये बांधण्यात आला आणि त्यावर मेघडंबरी उभारण्यात आली होती; परंतु काळानुसार या ठिकाणी वास्तू जीर्ण होऊ लागली.
लोखंडी सळ्या, प्लास्टर आणि वीटकाम झिजल्याने परिसर विद्रूप दिसू लागला होता. यानंतर कोल्हापूरचे युवराज संभाजीराजे यांनी मेघडंबरीमध्ये शिवरायांच्या मूर्तीची स्थापना केली होती; मात्र मूळ अधिष्ठानालगतचे जुने बांधकाम कायम ठेवण्यात आले होते. सध्याच्या संवर्धन मोहिमेत सिंहासनाच्या
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.