Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

सांगलीवाडीच्या सौ. लक्ष्मीबाई पाटील विद्यालयाचा निकाल ९१ टक्के अनुष्का पाटील विद्यालयात प्रथम

सांगलीवाडीच्या सौ. लक्ष्मीबाई पाटील विद्यालयाचा निकाल ९१ टक्के 
अनुष्का पाटील विद्यालयात प्रथम

सांगलीवाडी : खरा पंचनामा 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केलेल्या दहावी (SSC) परीक्षेत सांगलीवाडी येथील सौ. लक्ष्मीबाई पांडुरंग पाटील विद्यालयाने ९१ टक्के निकाल लावून यशाची परंपरा कायम राखली आहे.

विद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये अनुष्का प्रकाश पाटील (९५.२० टक्के) हिने प्रथम क्रमांक पटकावला. तर प्रेम अमित सातपुते (९३ टक्के) द्वितीय आणि  तेजश्री दिलीप देसाई (९०.२० टक्के) हिने तृतीय क्रमांक मिळवला. हर्षवर्धन शिंदे (८९ टक्के) आणि सिद्धी माने (८८.४० टक्के) यांनी अनुक्रमे चतुर्थ व पाचवा क्रमांक मिळवला.

विद्यालयातील १८ विद्यार्थ्यांनी विशेष श्रेणी (Distinction), ४३ विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी, २१ विद्यार्थ्यांनी द्वितीय श्रेणी, तर ८ विद्यार्थ्यांनी पास श्रेणी मिळवली आहे.

या घवघवीत यशाबद्दल सर्वोदय शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा श्रीमती जयश्रीताई मदनभाऊ पाटील, उपाध्यक्ष जी. के. पवार, सचिव आनंदराव पाटील, सहसचिव विजय पाटील, मुख्याध्यापक सूर्यकांत गस्ते व सर्व शिक्षक वृंदांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.