घरफोडी करणाऱ्या गुन्हेगारासह गांजा पुरवणाऱ्यास अटक
सांगली एलसीबीची कारवाई
सांगली : खरा पंचनामा
जिल्ह्यात घरफोडी करणाऱ्या एकाला अटक करून दोन गुन्हे उघडकीस आणण्यात यश आले आहे. तर एका गुन्ह्यात गांजा पुरवणाऱ्याला अटक करण्यात आल्याची माहिती एलसीबीचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनी दिली.
रोहन सनी लोंढे (वय २२, रा. पिंपरी भारतनगर, पुणे) असे घरफोडीच्या गुन्ह्यात अटक केलेल्याचे नाव आहे. तर त्याचा साथीदार यश ऊर्फ गट्टया देशमुख (रा. पिंपरी, भारतनगर, पुणे) हा सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. तर गांजा पुरवल्याच्या गुन्ह्यात ज्ञानेश्वर मदने (वय २९, रा. माऊली मंदीराजवळ, मालखांबी, ता. माळशिरस, जि. सोलापुर) याला अटक करण्यात आली आहे.
विविध गुन्ह्यातील संशयितांना पकडण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर अधीक्षक कल्पना बारवकर यांनी एलसीबीला दिल्या होत्या. त्यानुसार निरीक्षक झाडे यांनी उपनिरीक्षक महादेव पोवार यांचे पथक तयार केले होते.
पथकातील सागर लवटे, विक्रम खोत यांना घरफोडीचे गुन्हे लोंढे आणि देशमुख यांनी केल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पथकाने लोंढे याला ताब्यात घेऊन कसून चौकशी केल्यावर त्याने साथीदार देशमुख याच्यासोबत घरफोडी केल्याची कबुली दिली. तसेच देशमुख न्यायालयीन कोठडीत असल्याचे सांगितले. तर गांजा पुरवणारा मदने हा विटा कडेगाव रस्त्यावरील एका ठिकाणी येणार असल्याची माहिती अभिजित माळकर, संकेत कानडे यांना मिळाली होती. पथकाने तेथे सापळा रचून त्याला अटक केली.
पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर अधीक्षक कल्पना बारवकर, एलसीबीचे निरीक्षक संजीव झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक महादेव पोवार, अमित परिट, सागर लवटे, अनिल कोळेकर, नागेश खरात, सोमनाथ गुंडे, अमर नरळे, अमिरशा फकीर, संदीप नलावडे, मच्छिद्र बर्डे, सागर टिंगरे, अमोल ऐदाळे, विक्रम खोत, संदीप पाटील, प्रकाश पाटील, श्रीधर बागडी, अभिजीत माळकर, संकेत कानडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.