Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

शिवसेना पक्ष, चिन्ह सुनावणीत ठाकरेंच्या वकिलांना सुप्रीम कोर्टाने खडसावले

शिवसेना पक्ष, चिन्ह सुनावणीत ठाकरेंच्या वकिलांना सुप्रीम कोर्टाने खडसावले

नवी दिल्ली : खरा पंचनामा 

सुप्रीम कोर्टात शुक्रवारी शिवसेना पक्ष व चिन्हाबाबत सुनावणी पार पडली. यावेळी कोर्टाने दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून घेत बेजबाबदार विधाने टाळा असे सांगत सुप्रीम कोर्टाने उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या नेत्यांना खडे बोल सुनावले. त्यासोबतच आता या प्रकरणी पुढील सुनावणी 30 जुलैला होणार आहे.

शिवसेनेत 22 जून 2022 ला उभी फूट पडली. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतील 40 आमदार व 13 खासदार सोबत घेत बंडखोरी केली होती. त्यावेळेस पासून सुप्रीम कोर्टात शिवसेनेच्या पक्ष आणि पक्षाचे निवडणूक चिन्ह या दोन्हींचा वाद हा सुप्रीम कोर्टात सुरु आहे. या खटल्याची सुनावणी शुक्रवारी सुप्रीम कोर्टात पार पडली. यावेळी सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या कोर्टासमोर ठाकरेंच्या आणि शिंदेंच्या वकिलांनी युक्तीवाद केला. सुनावणीला सुरुवात झाल्यानंतर अवघ्या काही वेळातच ही सुनावणी संपली.

सुप्रीम कोर्टात शुक्रवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास सुनावणीला सुरुवात झाली. यावेळी सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर सुनावणीसाठी प्रकरण आल्यानंतर दोन्ही बाजूकडून युक्तीवाद करण्यात आला. त्यानंतर सुप्रीम कोर्टाने उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या नेत्यांना बेजबाबदार वक्तव्य टाळण्याबाबत खडसावले.

यावेळी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील वकिलांनी प्रकरणाची लवकर सुनावणी घेण्याची विनंती न्यायालयाकडे केली. सुनावणीदरम्यान वकिलांनी प्रकरण प्रलंबित असल्याने त्यावर तातडीने सुनावणी होणे आवश्यक असल्याचे नमूद केले. त्यावर सरन्यायाधीशांनी स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया देताना नाराजी व्यक्त केली.

सर्वप्रथम तुम्ही तुमच्या लोकांना माध्यमांमध्ये जाऊन सर्वोच्च न्यायालय निर्णय घेत नाही, असे बेजबाबदार विधान करण्यापासून थांबवा," असे सरन्यायाधीशांनी सुनावणीदरम्यान म्हटले. त्यासोबतच शिवसेना पक्ष चिन्ह प्रकरणी पुढील सुनावणी 30 जुलै रोजी होईल, असे सर्वोच्च न्यायालयाकडून सांगण्यात आले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.