Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

सिद्धरामय्या यांचा कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदाचा अखेर राजीनामा, कर्नाटकात आता डी के शिवकुमार पर्व !

सिद्धरामय्या यांचा कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदाचा अखेर राजीनामा, कर्नाटकात आता डी के शिवकुमार पर्व !

बेंगलूरू : खरा पंचनामा 

गेल्या काही दिवसांपासून कर्नाटकच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत होत्या. सत्ताधारी काँग्रेसमध्ये सत्तेचे खांदेपालट होणार असे सांगितले जात होते. त्या दिशेने काँग्रेसने पाऊलही टाकले होते. असे असतानाच आता कर्नाटकचे विद्यमान मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्याचे समोर आले आहे. आता सिद्धरामय्या यांची जागा काँग्रेसचेच नेते डी के शिवकुमार हे घेणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार येत्या 30 मे रोजी डी के शिवकुमार हे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. कर्नाटकच्या जनतेच्या हितासाठी मी हा राजीनामा देत आहे, असे सिद्धरामय्या यांनी सांगितले आहे.

सिद्धरामय्या यांनी पत्रकार परिषद घेऊन राजीनामा दिल्याचे जाहीर केले आहे. तीन वर्षांपूर्वी कर्नाटकमध्ये विधानसभा निवडणुका झाल्या होत्या. त्या वेळी डी के शिवकुमार हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष होते. ते मुख्यमंत्रिपदाच्या रेसमध्ये होते. तेच मुख्यमंत्री होतील, असे म्हटले जात होते. परंतु सिद्धरामय्या यांचा राजकीय अनुभव मोठा असल्याने त्यांच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ पडली होती. परंतु सिद्धरामय्या मुख्यमंत्री झाल्यानंतर तेव्हाच अडीच-अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदाचा फॉर्म्यूला ठरलेला होता. अगोदरच्या अडीच वर्षात सिद्धरामय्या हे मुख्यमंत्री असतील आणि नंतरच्या अडीच वर्षात डी के शिवकुमार हे मुख्यमंत्री असतील, असे ठरवण्यात आले होते. त्यानुसारच आता सिद्धरामय्या यांनी आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिलेला आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.