Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

"साहेब काहीतरी करा, पक्षात राहणं कठीण..." अजित पवार गटाच्या आमदारांचे थेट शरद पवारांना फोन

"साहेब काहीतरी करा, पक्षात राहणं कठीण..." 
अजित पवार गटाच्या आमदारांचे थेट शरद पवारांना फोन

मुंबई : खरा पंचनामा 

महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मोठ्या घडामोडींना वेग आला आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील आमदारांमध्ये गेल्या काही दिवसांपासून प्रचंड अस्वस्थता पसरली आहे.

या अस्वस्थेतून काही आमदारांनी थेट राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याशी फोनवरून संपर्क साधल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांनी दिली आहे. "साहेब, सध्याच्या राजकीय परिस्थितीत पक्षात राहणे कठीण झाले आहे, आता तुम्हीच काहीतरी करा," असे साकडे या आमदारांनी शरद पवारांना घातल्याचे समजते. पक्षांतर्गत धुसफूस आणि भविष्यातील राजकीय अनिश्चिततेमुळे आमदार कमालीचे चिंतेत आहेत.

अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची धुरा सुनेत्रा पवार यांच्या हाती आली. मात्र, मागील काही राजकीय घटनाक्रमात मोठ्या घडामोडी ठरल्या. राष्ट्रवादी काँग्रेसकडून २९ एप्रिल रोजी केंद्रीय निवडणूक आयोगाला पाठवलेल्या पत्रात प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांच्यासह आणखी काही ज्येष्ठ नेत्यांना डावलण्यात आल्याचे समोर आले. त्यानंतर राष्ट्रवादीत काही आलबेल नसल्याचे समोर आले. राष्ट्रवादीची धुरास सुनेत्रा पवार, त्यांचे चिरंजीव पार्थ पवार आणि जय पवार यांच्याकडे गेली असल्याचे चित्र आहे. त्यातूनच पटेल आणि तटकरे यांचे पंख छाटण्यात आल्याची चर्चा सुरू झाली आहे. अशातच राष्ट्रवादी अजित पवार गटामधील आमदारांची अस्वस्थता वाढली असल्याचे म्हटले जात आहे. तर, दुसरीकडे त्यापैकी काही आमदारांनी शरद पवारांना साद घातल्याची माहिती सूत्रांनी दिली.

राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या आमदारांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांना साकडं घातलं आहे. काही आमदारांनी थेट राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याशी फोनवरून संपर्क साधला. "साहेब, सध्याच्या राजकीय परिस्थितीत पक्षात राहणे कठीण झाले आहे, आता तुम्हीच काहीतरी करा," असे साकडे घातले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीत भूकंप होणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.