भिलवडीजवळ देशी बनावटीचे पिस्तूल घेऊन फिरणाऱ्यास अटक
पिस्तूल, काडतूस जप्त : एलसीबीची कारवाई
सांगली : खरा पंचनामा
बेकायदा देशी बनावटीचे पिस्तूल घेऊन फिरणाऱ्या एकाला अटक करण्यात आली. नागठाणे फाटा ते वाळवा रस्त्यावर सांगली एलसीबीच्या पथकाने केलेल्या कारवाईत पिस्तूल, काडतूस असा 75 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती एलसीबीचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनी दिली.
अनिकेत गुंडा करांडे (वय २४, रा. विठ्ठरायचीवाडी, ता. कवठेमहांकाळ) असे अटक केलेल्याचे नाव आहे. तर अक्षय पाटील (रा. डफळापूर, ता. जत) हा पसार झाला आहे. बेकायदा शस्त्र बाळगणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर अधीक्षक कल्पना बारवकर यांनी विशेष पथक तयार करून कारवाई करण्याच्या सूचना एलसीबीला दिल्या आहेत. त्यानुसार निरीक्षक झाडे यांनी उपनिरीक्षक कुमार पाटील यांचे पथक तयार केले होते.
पथक भिलवडी परिसरात गस्त घालत असताना एकजण नागठाणे फाटा ते वाळवा रस्त्यावर पिस्तूल घेऊन थांबल्याची माहिती मिळाली. पथकाने तेथे सापळा रचून करांडे ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतल्यावर त्याच्याकडे देशी बनावटीचे पिस्तूल, काडतूस सापडले. त्याबाबत कसून चौकशी केल्यावर त्याने ते अक्षय पाटील याच्याकडून घेतल्याची कबुली दिली. त्याला अटक करून पिस्तूल, काडतूस जप्त करण्यात आले. त्याला भिलवडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर अधीक्षक कल्पना बारवकर, एलसीबीचे निरीक्षक संजीव झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक कुमार पाटील, संजय पाटील, संदीप पाटील, अतुल माने, रणजीत जाधव, सचिन कनप, सुनिल जाधव, सुमित सुर्यवंशी, सुभाष सुर्यवंशी, सुशांत चिले, भिलवडी पोलीस ठाण्याचे धिरज खुडे, अतुल शेळके, रोहित माने, सत्पाल सावंत, सायबर पोलीस ठाण्याचे अजय पाटील, अभिजीत पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.