Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

घरफोडी, जबरी चोरी करणाऱ्या एकाला अटक : दोन गुन्हे उघड सांगली एलसीबीची कारवाई

घरफोडी, जबरी चोरी करणाऱ्या एकाला अटक : दोन गुन्हे उघड 
सांगली एलसीबीची कारवाई 

सांगली : खरा पंचनामा 

जत पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी, जबरी चोरी करणाऱ्या एकाला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून दोन गुन्हे उघडकीस आणण्यात यश आल्याची माहिती एलसीबीचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनी दिली.

विशाल गारवेल पवार (वय २३, रा. दुधाळ वस्ती, जत) असे अटक केलेल्याचे नाव आहे. घरफोडी, जबरी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर अधीक्षक कल्पना बारवकर यांनी एलसीबीला दिल्या होत्या. त्यानुसार निरीक्षक झाडे यांनी उपनिरीक्षक महादेव पोवार यांचे एक पथक तयार केले होते.

पथक जत परिसरात गस्त घालत असताना पवार हा जत ते घाडगेवाडी रस्त्यावर दुचाकीवरून फिरत असल्याची माहिती पथकाला मिळाली. पथकाने तेथे जाऊन पवार याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे कसून चौकशी केल्यावर त्याने गुन्ह्यांची कबुली दिली. त्याला अटक करून दुचाकी, रोकड जप्त करण्यात आली. त्याला जत पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर अधीक्षक कल्पना बारवकर, एलसीबीचे निरीक्षक संजीव झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली उप निरीक्षक महादेव पोवार, अमित परीट, संदीप नलावडे, सागर लवटे, अमर नरळे, अमिरशा फकीर, मच्छिद्र बर्डे, सतिश माने, सागर टिंगरे, प्रकाश पाटील, विक्रम खोत, केरबा चव्हाण, कॅप्टन गुंडवाडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.