Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

NEET पेपरफुटी प्रकरणात मोटेगावकर पुरता अडकणार, घरातूनच शोधला 'विटनेस'

NEET पेपरफुटी प्रकरणात मोटेगावकर पुरता अडकणार, घरातूनच शोधला 'विटनेस'

मुंबई : खरा पंचनामा 

देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या NEET (नीट) पेपर लीक प्रकरणात आता एक अत्यंत मोठी आणि धक्कादायक अपडेट समोर आली आहे. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) लातूरमधील प्रसिद्ध शिक्षण व्यावसायिक आरोपी शिवराज मोटेगावकर याच्या भोवतीचा चौकशीचा फास घट्ट केला आहे. मोटेगावकरचा पाय आणखी खोलात जाणार आहे. मोटेगावकरच्या पेपर फुटीच्या गैरकृत्याची लंका जाळण्यासाठी सीबीआयने घरातूनच साक्षीदार तयार केल्याची माहिती समोर आली आहे.

नीट पेपर फुटीच्या प्रकरणाच्या तपासाचे धागेदोरे हे हरियाणा, राजस्थानमधून महाराष्ट्रापर्यंत पोहचले. यामध्ये राज्यातून अनेकांना अटक झाली. यामध्ये नीटसाठी प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्या शिक्षकांनाही अटक करण्यात आली आहे. आता, या रॅकेटकडून प्रश्नपत्रिका खरेदी करणारे पालक-विद्यार्थी चौकशीच्या रडारवर आले आहेत. सीबीआयने पेपरफुटी प्रकरणात मोटेगावकरच्या मुलाचीदेखील चौकशी केली. या चौकशीत मोटेगावकरच्या मुलाने धडाधडा माहिती दिली असल्याचे समोर आले.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, CBI ने मोटेगावकरच्या अल्पवयीन मुलाची पुणे येथे कसून चौकशी केली. या चौकशीदरम्यान त्याने अत्यंत महत्त्वाचा खुलासा केला आहे. "वडिलांनी परीक्षेच्या सुमारे १० दिवस आधीच नीट परीक्षेचे फिजिक्स (भौतिकशास्त्र), केमिस्ट्री (रसायनशास्त्र) आणि बायोलॉजी (जीवशास्त्र) या तिन्ही विषयांचे पेपर मिळवून दिले होते," अशी धक्कादायक कबुली या मुलाने दिली आहे. या कबुलीजबाबामुळे मोटेगावकर यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली असून, पेपर लीकचे रॅकेट किती आधीपासून सक्रिय होते हे स्पष्ट होत आहे. सीबीआयकडून आता मोटेगावकरच्या या अल्पवयीन मुलाला या प्रकरणात मुख्य साक्षीदार करण्याची तयारी सुरू झाली असल्याचे सूत्रांनी सांगितले.

तपास यंत्रणांनी यापूर्वी लातूरमधीलच एका नामांकित बालरोगतज्ज्ञ डॉ. शिरुरे यांनाही या प्रकरणात साक्षीदार केले आहे. डॉ. शिरुरे यांनी देखील आपल्या मुलासाठी लीक झालेला पेपर विकत घेतल्याचा संशय आहे. दरम्यान, सीबीआय आता या दोन्ही साक्षीदारांच्या कबुलीजबाबांची डिजिटल आणि डॉक्युमेंट्स पुराव्यांद्वारे कसून पडताळणी करत आहे. या पडताळणीनंतर या हायप्रोफाइल रॅकेटमधील अनेक बड्या चेहऱ्यांचे बुरखे फाटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.