Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

राजगड सहलीवर काळाचा घाला! पाबे घाटात ट्रॅव्हल बस ४० फूट दरीत; दोन ठार, 19 जण जखमी..

राजगड सहलीवर काळाचा घाला! 
पाबे घाटात ट्रॅव्हल बस ४० फूट दरीत; दोन ठार, 19 जण जखमी..

पुणे : खरा पंचनामा 

राजगड किल्ला पाहण्यासाठी मुंबईहून निघालेल्या पर्यटकांच्या खाजगी बसचा (ट्रॅव्हलचा) राजगड तालुक्यातील पाबे घाटात भीषण अपघात झाला असून यामध्ये दोन जणांचा मृत्यू तर 19 जण जखमी झाल्याची घटना रविवार (ता. 28) जून रोजी पहाटे एक वाजण्याच्या सुमारास घडली.

या दुर्घटनेमध्ये विश्वास बाबुराव सातिम (वय 25. वर्ष) राहणार विलेपार्ले, मुंबई व ध्वनी चंद्रेश ठक्कर (वय. 23 वर्ष) राहणार कांदिवली, मुंबई या दोघांचा मृत्यू झाला असून ट्रॅव्हल बसच्या ड्रायव्हर सह 18 जण गंभीर जखमी झाले असून काही जणांवर वेल्हे ग्रामीण रुग्णालयात तर पुण्यातील खाजगी रुग्णालयात त काही जणांवर उपचार सुरू असल्याची माहिती वेल्हे पोलिसांनी दिली.

वेल्हे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबईतील एक खाजगी कंपनीतील 20 जणांचा ग्रुप खाजगी ट्रॅव्हल क्रमांक एमएच- ४७-ए. एस. 0934 या बसमधून किल्ला राजगड पाहण्यासाठी येत वळणावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने बसने रस्त्यावरील संरक्षण कठडा तोडत सुमारे 30 ते 40 फूट दरीत कोसळली. या दुर्घटनेमध्ये बसमधील दोघांचा मृत्यू झाला असून 18 जण जखमी आहेत. यामध्ये खाजगी बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

घटनेची माहिती मिळताच वेल्हे पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर शेवते यांच्या मार्गदर्शनाखाली गोपनीय विभागाचे कर्मचारी आकाश पाटील, निलेश राणे, पंकज मोघे, यांच्यासह राजगड व हवेली आपत्ती व्यवस्थापन टीमचे सदस्य तानाजी भोसले, गणेश सपकाळ, संदीप सोळसकर, कृष्णा मरगळे यांनी घटनास्थळी धाव घेतली व तातडीने बचाव कार्य सुरू करण्यात आले बसच्या खाली अडकलेल्या ड्रायव्हर तसेच इतर पर्यटकांना बाहेर काढत प्राथमिक उपचारासाठी वेल्हे येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी वेल्हे ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर चंद्रकांत भोईटे म्हणाले या अपघातामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला असून ड्रायव्हरसह इतर 18 जण जखमी आहेत.

खाजगी बस चालक संदीप तुकाराम गायकवाड (वय.40) अंधेरी मुंबई, आदित्य सुरेश भुरवणे, (वय 24) महात्मा गांधी नगर, तेजस कॉलनी सेक्टर नंबर तीन, मुंबई, प्रेमळ प्रभाकर कोले (वय.23) मोरेगाव, नालासोपारा पूर्व, मुंबई, दत्ता वसंत गिजे (वय.32) रा. चुनाभट्टी, मुंबई, विकास महादेव बागल (वय.21) मानखुर्द, मुंबई, अक्षय नथू चिकणे (वय.23), अंधेरी, मुंबई. प्रियंका यशवंत आंबेकर (वय.27) चुनाभट्टी , मुंबई, प्रियंका तात्यासो जामदार (वय. 23) अंधेरी, मुंबई, सोनाली रामजी घागरे (वय.25) भांडुप, मुंबई, समीक्षा गणेश नलावडे (वय.26) विलेपार्ले, मुंबई. सुरज रमेश पिंगळे (वय.28) डोंबिवली, मुंबई, नलिनी राहुल भगत (वय.30) विरार, मुंबई, दीपिका रूदील यादव (वय 21) गावदेवी, मुंबई, दीपांशू दिनेश यादव (वय. 19) जोगेश्वरी, मुंबई, अतिश विजय शिगवण (वय. 24) फिल्म सिटी रोड, संतोष नगर, मुंबई, गिरीश रवींद्र जंगम (वय.28) शिवटेकडी, जोगेश्वरी, ईस्ट मुंबई. अक्षय मंगेश गोसावी (वय.27) भांडुप , पश्चिम मुंबई, साक्षी सुभाष सर्वेकर (वय.25) भांडुप, ईस्ट मुंबई. प्रथमेश महेश मटकर (वय. 23) नालासोपारा, पूर्व मुंबई.

पाबे घाट मार्गे हा राजगड तालुक्यामध्ये पुण्या व मुंबईहून येण्यासाठी सर्वात जवळचा मार्ग आहे. मात्र प्रशासन व लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे या घाटांमधील तीव्र वळणांवरती संरक्षक कठडे व रेलिंग संदर्भात वारंवार मागणी होऊनही कठडे बांधले गेले नाहीत. पाबे घाट उतरताना हा अपघात झाला व सुदैवाने गाडी झाडाला अडकल्याने अनेक प्रवाशांचे जीव वाचले. अन्यथा मोठी जीवित हानी झाली असती.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.