"हम कबड्डी के खिलाडी है, शतरंज के नही... "
मुंबई : खरा पंचनामा
राष्ट्रवादीकडून राज्यसभेसाठी ज्येष्ठ नेते छगन भुजबळ इच्छुक होते. मात्र, राज्यसभेवर जाण्याकरिता त्यांनी मोठी अट ठेवली होती. भुजबळांनी स्वतःचे मंत्रिपद समीर भुजबळ यांना देण्याबाबत भाष्य केले होते.
याकरिता दिल्ली भाजपाने रेड सिग्नल दिला. छगन भुजबळ यांना मोठा धक्का देत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून थेट राजेंद्र जैन यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. त्यानंतर छगन भुजबळ नाराज असल्याचे सांगितले जाते. यादरम्यानच आता यावर पहिली प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी दिली. छगन भुजबळ यांनी म्हटले की, मला राज्यसभा आणि लोकसभेला जायचं होतं. चार पाच वेळा संधी आली. दुर्देवाने संधी मिळाली नाही. यावेळी जायचं आहे. मकरंद पाटील मंत्री आहेत. त्यांचे भाऊ खासदार आहे. सुनेत्रा पवार मंत्री, पुत्र खासदार, तटकरे खासदार पुत्र आमदार. मलाही हा नियम लागू करण्याची विनंती केली.
वर कम्युनिकेट करायला वेळ लागला असावा. भाजपकडे प्रपोजल गेलं. जेव्हा मंत्रिमंडळाचं विस्तारीकरण होईल तेव्हा विचार करू. असं कळलं. त्यामुळे भाजपने नकार दिला यात तथ्य नाही. नाराज नाही. इतरांना जो न्याय दिला. ते मंत्री आहेत, खासदार आहेत. त्यांची मुलंबाळं आमदार आहेत. तोच न्याय मला लावावा असं म्हटलं होतं. अन्याय काय आहे...
चालायचंच. आज नाही तर कल, कल नही तो कल... मी कबड्डीचा खेळाडू आहे. बुद्धीबळाचा नाही. बुद्धीबळ मला जमत नाही. अरे हमने कहां ना हम कबड्डी के प्लेअर है, शतरंज के खिलाडी नही है.. जैन यांच्या अर्जावर बोलताना भुजबळांनी म्हटले की, 20 दिवसांपासून ठरलेले. मला राज्यसभा की लोकसभा विचार सुरू होता. मी राज्यसभेवर जातो असे बोललो होतो.
मंत्रिमंडळाच विस्तारीकरण होईल. मलाही न्याय मिळाला पाहिजे. सर्व एकत्रित येण्यासाठी पटेल बंगल्यावर आलेले होते, असेही भुजबळांनी म्हटले. आज राजेंद्र जैन यांनी अर्ज भरला आहे. यावेळी सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल आणि छगन भुजबळ हे उपस्थित होते. छगन भुजबळ यांना बघताच वाकून नमस्कार करताना राजेंद्र जैन हे दिसले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.