सांगलीत 'प्राकृत विद्या शिक्षण शिबिर' उत्साहात संपन्न
पूजा फडके
सांगली : खरा पंचनामा
प्राकृत भाषेचे संवर्धन आणि जैन साहित्याचा प्रसार करण्याच्या उद्देशाने सांगलीत आयोजित केलेले सात दिवसीय 'प्राकृत विद्या शिक्षण शिबिर' नुकतेच उत्साहात संपन्न झाले. प्राकृत भाषा विकास फाउंडेशन (म.प्र.) सागर आणि श्री १००८ कल्पतरू पार्श्व-पद्मावती दिगंबर जैन मंदिर (धामणी रोड, सांगली) यांच्या संयुक्त विद्यमाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाला प्राकृताचार्य १०८ श्री सुनील सागरजी गुरुदेव यांचे आशीर्वाद लाभले.
शिबिराचे उद्घाटन डॉ. ममता जैन (पुणे) व सौ. शैलजा चौगुले यांच्या हस्ते झाले. या सात दिवसांत डॉ. ममता जैन यांनी ब्राह्मी लिपी, प्रा. बाळासाहेब भगरे यांनी व्याकरण, तर डॉ. मंजुषा निलाखे व सौ. वनमाला भगरे यांनी 'पाइय विण्णाणं' पुस्तिकेचे सोप्या भाषेत अध्यापन केले.
या शिबिरात ५३ शिबिरार्थी आणि विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन ब्राह्मी लिपीचे सुंदर लेखन केले. शेवटी लेखी परीक्षा घेऊन सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले व 'जयदू भारती' स्तुतीने शिबिराचा समारोप झाला.
हे शिबिर यशस्वी करण्यासाठी मंदिर कमिटीचे अध्यक्ष ॲड. उल्हास चिप्रे, सौ. गीतांजली उपाध्ये (क्षेत्रीय संयोजिका) आणि फाउंडेशनच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.