Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

ठाकरे गटातील फुटीवर अखेर शिक्कामोर्तब? व्हीप उडवून लावला. सहा खासदारांची दांडी

ठाकरे गटातील फुटीवर अखेर शिक्कामोर्तब? 
व्हीप उडवून लावला. सहा खासदारांची दांडी

नवी दिल्ली : खरा पंचनामा 

दिल्लीतून या घडीची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. ठाकरे सेनेत उभी फूट पडल्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. बंडखोर सहा खासदारांनी व्हीप उडवून लावला आहे. कालपासून ज्या खासदारांनी बंडाचे निशाण फडकावले आहे.

ते उद्धव सेनेच्या खासदारांच्या बैठकीला अद्यापही पोहचलेले नाही. गेली दहा मिनिटे उलटूनही या बैठकीला त्यातील एकानेही हजेरी लावलेली नाही. त्यांनी पक्षाचा व्हीपच उडवून लावला आहे. त्यामुळे आता या खासदारांविरोधात कायदेशीर कारवाईचा मार्ग मोकळा झाला आहे.

आज 11 वाजता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने संसदेच्या कार्यालयात पक्षाची बैठक बोलावली होती. कालच त्यासाठी सर्व खासदारांना व्हिप बजावण्यात आला होता. आज बैठक सुरू झाली तेव्हा राज्यसभेतील एक आणि लोकसभेतील तीन खासदार या बैठकीला उपस्थित होते. संजय राऊत, अनिल देसाई, अरविंद सावंत, राजाभाऊ वाजे

ठाकरेंचे 6 खासदार फुटले
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे सहा खासदार फुटल्याचे आता स्पष्ट झाले आहे. आज पक्षाने व्हिप बजावून सुद्धा हे खासदार अनुपस्थित राहिले.
संजय दिना पाटील, संजय देशमुख, संजय (बंडू) जाधव, ओमराजे निंबाळकर, संजय वाकचौरे, नागेश पाटील आष्टीकर

आता ठाकरे सेनेकडून या अनुपस्थित खासदारांविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येण्याची शक्यता आहे. या सहा खासदारांनी बैठकीला दांडी मारल्याचे आता स्पष्ट झाले आहे. या गैरहजर खासदारांवर आता उद्धव सेना अपात्रतेची कारवाई करणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागेल आहे. तर काहींच्या मते अगोदर या खासदारांना अगोदर पक्ष कारणे दाखवा नोटीस बाजावेल आणि नंतर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करेल अशी शक्यता वर्तवली जात आहे.

ठाकरे सेनेचे 6 खासदार फुटल्याचे स्पष्ट झाले आहे. उद्धव ठाकरे सेनेचा व्हीप ही त्यांनी जुमानला नाही. स्वतंत्र गट स्थापन करण्याचा अगोदरच लोकसभा अध्यक्षांकडे अर्ज केल्याने व्हीप लागू होत नसल्याचा दावा कालच बंडखोरांकडून करण्यात आला होता. 6 खासदारांच्या स्वतंत्र गटाला मंजूरी मिळाल्याने त्यांचा शिंदे सेनेतील विलिनीकरणाचा मार्ग मोकळा झाल्याचे मानले जात आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.