Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

सांगलीत मतदानाच्या पार्श्वभूमीवर चार दिवस 'ड्राय डे'!नियम मोडल्यास कडक कारवाईचे आदेश

सांगलीत मतदानाच्या पार्श्वभूमीवर चार दिवस 'ड्राय डे'!
नियम मोडल्यास कडक कारवाईचे आदेश

पूजा फडके 
सांगली : खरा पंचनामा 

विधानपरिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासनाने 'ड्राय डे' (दारूबंदी) घोषित केला आहे. या काळात सर्व प्रकारची मद्यविक्री दुकाने आणि बार पूर्णपणे बंद राहतील.

प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, खालील तारखांना जिल्ह्यात मद्यविक्रीवर निर्बंध असतील:
१६ जून: आज दुपारी ४.०० वाजेनंतर मद्यविक्री बंद राहील.
१७ जून आणि १८ जून: मतदान प्रक्रियेमुळे हे दोन्ही दिवस पूर्णवेळ 'ड्राय डे' म्हणून पाळले जातील.
२२ जून:मतमोजणीच्या दिवशीही खबरदारीचा उपाय म्हणून संपूर्ण जिल्ह्यात दारूबंदी लागू असेल.

याशिवाय, वर्षातील इतर मुख्य शासकीय सुट्ट्या जसे की १५ ऑगस्ट (स्वातंत्र्य दिन), २५ सप्टेंबर (गणेश विसर्जन), २ ऑक्टोबर (महात्मा गांधी जयंती) आणि २० नोव्हेंबर (कार्तिकी एकादशी) या दिवशीही नियमानुसार 'ड्राय डे' कायम राहणार आहे.

निवडणूक काळात कुठेही बेकायदेशीर मद्यविक्री किंवा वाहतूक होणार नाही, यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि सांगली पोलीस प्रशासनाने विशेष पथके तैनात केली आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.