शरद पवारांना मोठा धक्का !
महाराष्ट्र राज्य कुस्ती परिषदेची संलग्नता रद्दच, याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली
मुंबई : खरा पंचनामा
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र राज्य कुस्तीगर परिषद यांची भारतीय कुस्ती महासंघाने केलेली संलग्नता रद्द करण्याची कारवाई मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी (१५ जून २०२६) कायम ठेवली.
भारतीय कुस्ती महासंघाने १ जानेवारी २०२३ रोजी महाराष्ट्र राज्य कुस्ती परिषदेची संलग्नता रद्द करून तिच्या जागी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ याला मान्यता दिली होती.
या निर्णयाविरोधात महाराष्ट्र राज्य कुस्ती परिषदेने न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायमूर्ती भारती डांगरे आणि न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे यांच्या खंडपीठाने ही याचिका फेटाळून लावली. महाराष्ट्र राज्य कुस्ती परिषदेने न्यायालयात असा युक्तिवाद केला होता की, संघटनेची संलग्नता रद्द करण्याचा निर्णय भारतीय कुस्ती महासंघाच्या कार्यकारी समितीने न घेता निरीक्षण समितीने घेतला होता आणि हा निर्णय मनमानी स्वरूपाचा होता.
नोव्हेंबर २०२२ मध्ये दिलेल्या आदेशात न्यायमूर्ती संदीप शिंदे यांनी नमूद केले होते की, "भारतीय कुस्ती महासंघाच्या कार्यकारी समितीचा निर्णय हा केवळ नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वांचे उल्लंघन करणारा नव्हता, तर संबंधितांना कोणतीही संधी न देता त्यांच्या पाठीमागे घेण्यात आलेला होता. निर्णय घेताना प्रक्रियात्मक न्यायाला पूर्णपणे फाटा देण्यात आला होता." प्रत्यक्षात शरद पवार यांनी तब्बल ४० वर्षांहून अधिक काळ महाराष्ट्र राज्य कुस्ती संघटनेचे नेतृत्व केले होते.
मात्र, ४ जुलै २०२२ रोजी भारतीय कुस्ती महासंघाने संघटनेची कार्यकारिणी बरखास्त केली होती. मुंबई उच्च न्यायालयाने नोव्हेंबर २०२२ मध्ये दिलेल्या आदेशात असेही स्पष्ट केले होते की, संघटनेची निवडून आलेली कार्यकारिणी तिचा कार्यकाळ पूर्ण होईपर्यंत पदावर राहील आणि संघटनेच्या संविधानानुसार दैनंदिन कामकाज चालवेल.
पण आता शरद पवार अध्यक्ष होते त्या महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या संघटनेची याचिका फेटाळून लावली. याचिकेमध्ये महाराष्ट्र राज्य कुस्ती संघटनेने म्हटले होते की, ३० जून २०२२ रोजी तत्कालीन भाजप खासदार आणि भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राष्ट्रीय कार्यकारी समितीच्या बैठकीत काही स्पर्धा आयोजित करण्यात अपयश आल्याचा ठपका ठेवून महाराष्ट्र राज्य कुस्ती परिषदेची कार्यकारिणी बरखास्त करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.