Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

"सतेज पाटलांच्या अंगावर जायचे का? युतीसाठी आणखी कसली परीक्षा देऊ"

"सतेज पाटलांच्या अंगावर जायचे का? युतीसाठी आणखी कसली परीक्षा देऊ"

कोल्हापूर : खरा पंचनामा 

'गोकुळ'चा अध्यक्ष शशिकांत पाटील-चुयेकर यांना करण्याचे ठरले असताना महायुतीचाच अध्यक्ष झाला पाहिजे, म्हणून आग्रह झाला आणि तसेच झाले, महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकीत आमदार सतेज पाटील यांच्या विरोधात लढलो. आणखी कसली परीक्षा देऊ? ढाल-तलवार घेऊन त्यांच्या अंगावर जायचे का? असा उद्विग्न सवाल वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी केला आहे.

महायुती म्हणून लढण्याचा निर्णय झाला असताना सातत्याने चौकशी लावून संस्थांना त्रास कोण देत आहे हे संस्थांना माहीती आहे. कोणीही काही म्हटले तरी एकदा ठरले की त्यात मी कधी बदल करत नाही, असेही मंत्री मुश्रीफांनी पत्रकारांना बोलताना म्हटलं आहे.

मंत्री मुश्रीफ म्हणाले, "मंत्री चंद्रकांत पाटील यांनी गोकुळच्या निवडणुकीसाठी ठरावाच्या संख्येवर जागा वाटप होईल, हे सांगितले त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. अंतिम मतदार यादीतील सभासद संख्या भागिले २५ त्यानुसार उमेदवारीसाठी मताचा कोटा निश्चित केला जाईल."

"राज्याच्या राजकारणात भाजप मोठा भाऊ आहेच. 'गोकुळ'बाबत कोण मोठा? याबद्दल मी काही बोलणार नाही. तसे बोलून मोठ्या भावाचा मला अपमान करायचा नाही," असे मंत्री मुश्रीफांनी सांगितलं.

"शासकीय ठेकेदारांनी निधीतून आमदारांना १० टक्के द्यावे "शासकीय ठेकेदारांनी निधीतून आमदारांना १० टक्के द्यावे लागतात, असा आरोप केला. त्यावर आपला आक्षेप आहे, सरसकट आमदारांबाबत असा आरोप करणे चुकीचे आहे. आम्ही अजून नीतिमत्ता सोडलेली नाही. आपल्याबाबत एकानेही सांगावे, राजीनामा देतो," असे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या स्वागताची महायुतीच्या वतीने जय्यत तयारी केली आहे. त्यांनी साखर कारखानदारी व जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी इचलकरंजी येथे १० मिनिटांचा वेळ दिला आहे. त्यावेळी अपात्र ११२ कोटी कर्जमाफीसह साखर कारखान्यांच्या प्रश्नावर चर्चा करणार असल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी म्हटलं.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.