वाळू उपसा चालू ठेवण्यासाठी मागितली साडे सहा लाखांची लाच!
अंबडच्या तहसीलदाराला रंगेहात पकडलं
अंबड : खरा पंचनामा
मराठवाड्यात लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईने सरकारी अधिकारी, कर्मचाऱ्यांना धडकी भरली आहे. जालना-बीडमध्ये एकाच दिवशी कारवाई करत एसीबीने एक पोलीस अंमलदार अन् दुसऱ्या कारवाईत थेट तहसीलदारालाच अटक केली.
या दोन धडक कारवायांमुळे प्रशासनाला धडकी भरली आहे. अंबडचे तहसीलदार विजय चव्हाण यांना एका प्रकरणात ६ लाख ४० हजार रुपयांची लाच स्वीकारताना बीडच्या पथकाने अटक केली.
जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बीडमध्ये कारवाई केल्यानंतर बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जालना जिल्ह्यात मोठी कारवाई केल्याचे समोर आले आहे. अंबडचे तहसीलदार विजय चव्हाण यांच्या छत्रपती संभाजीनगर येथील राहत्या घरी सापळा रचून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.
अंबड तालुक्यातील गोदावरी नदीपात्रातील वाळू उत्खननासाठी पोकलेन व ट्रक सुरू ठेवण्याच्या मोबदल्यात ही लाचेची मागणी केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. एसीबीने लाचेची रक्कम तब्बल ६ लाख ४० हजार रुपये स्वीकारताना तहसीलदार विजय चव्हाण जेरबंद केले. याप्रकरणी, छत्रपती संभाजीनगरच्या सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.