Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

​सांगली जिल्हा पोलीस दलातर्फे उद्या 'संडे ऑन सायकल' उपक्रमाचे आयोजनपोलीस अधीक्षक तुषार दोषी यांची प्रमुख उपस्थिती

​सांगली जिल्हा पोलीस दलातर्फे उद्या 'संडे ऑन सायकल' उपक्रमाचे आयोजन
पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांची प्रमुख उपस्थिती

पूजा फडके 
​सांगली : खरा पंचनामा 

केंद्र सरकारच्या 'फिट इंडिया' संकल्पनेतून प्रेरणा घेऊन, नागरिकांमध्ये आरोग्यदायी जीवनशैलीचा प्रसार करण्यासाठी सांगली जिल्हा पोलीस दलाच्या वतीने उद्या, रविवार दिनांक ७ जून २०२६ रोजी विशेष 'संडे ऑन सायकल - २०२६' सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती प्रभारी पोलीस उपअधीक्षक (गृह) गजानन सरगर यांनी दिली.
​'फिट रहा... हिट रहा... देशासाठी सदैव तत्पर रहा...!' या ब्रीदवाक्याला केंद्रस्थानी ठेवून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला सांगलीचे पोलीस अधीक्षक मा. तुषार दोषी यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
हा उपक्रम उद्या सकाळी ठीक ७.०० वाजता पोलीस अधीक्षक कार्यालय, सांगली येथून सुरू होईल. धावपळीच्या युगात आरोग्याकडे होणारे दुर्लक्ष टाळण्यासाठी आणि नागरिकांना व्यायामाची, सायकलिंगची आवड निर्माण व्हावी यासाठी पोलीस दलाने हे पाऊल उचलले आहे. या रॅलीमध्ये पोलीस अधिकारी, अंमलदार यांच्यासह शहरातील क्रीडाप्रेमी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने आपल्या सायकलींसह सहभागी व्हावे, असे आवाहन सांगली जिल्हा पोलीस दलाच्या वतीने करण्यात आले आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.