Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

२ लाख २० हजारांचे १६ गहाळ मोबाईल आणि दागिने नागरिकांना परतसायबर सेलची धडाकेबाज कामगिरी!

२ लाख २० हजारांचे १६ गहाळ मोबाईल आणि दागिने नागरिकांना परत
सायबर सेलची धडाकेबाज कामगिरी!

सांगली : खरा पंचनामा 

विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीत नागरिकांचे गहाळ झालेले एकूण २ लाख २० हजार रुपये किमतीचे १६ मोबाईल फोन आणि सोन्याचे दागिने शोधण्यात विश्रामबाग पोलिसांना मोठे यश आले आहे. हे सर्व मोबाईल आणि दागिने खात्री करून संबंधित नागरिकांना सन्मानपूर्वक परत करण्यात आले आहेत, ज्यामुळे नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले.

पोलीस अधीक्षक  तुषार दोषी, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती कल्पना बारवकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली गहाळ मोबाईलचा शोध घेण्यासाठी विशेष मोहीम आखण्यात आली होती. त्यानुसार सायबर सेलचे पोलीस उपनिरीक्षक प्रवीण कांचन, पोलीस नाईक मोरे, पोलीस कॉन्स्टेबल चौगुले आणि जगदाळे यांच्या पथकाने तांत्रिक माहितीच्या आधारे अत्यंत कौशल्याने या मोबाईलचा माग काढून ते शोधून काढले.

पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांच्या हस्ते हे मोबाईल मूळ मालकांना परत करण्यात आले. नागरिकांच्या सुविधेसाठी विश्रामबाग पोलिसांची ही मोहीम अशीच पुढेही सुरू राहील, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.