मुंबईत निकाल, कोल्हापुरातून CBI ला आदेश
पवनराजे प्रकरणानंतर फडणवीस-शिंदेंची अमित शाहंसोबत चर्चा
कोल्हापूर : खरा पंचनामा
पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणातील आरोपींना निर्दोष मुक्त करण्याच्या निर्णयाविरोधात सीबीआय वरिष्ठ न्यायालयात दाद मागणार आहेत. पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणात विशेष न्यायालयाने दिलेल्या निर्दोष मुक्तीच्या निकालाविरोधात केंद्रीय अन्वेषण ब्यूरो वरिष्ठ न्यायालयात अपील करणार आहे.
या निकालानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा केली. या चर्चेनंतर अमित शाह यांनी CBI ला निकालाविरोधात वरिष्ठ न्यायालयात दाद मागण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अमित शहा यांच्याशी बोलल्याची माहिती समोर येत आहे. पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणातील आरोपींना निर्दोष मुक्त करण्याच्या निर्णयाविरोधात CBI वरिष्ठ न्यायालयात दाद मागणार आहे. या निकालानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा केली. या चर्चेनंतर अमित शाह यांनी CBI ला निकालाविरोधात वरिष्ठ न्यायालयात दाद मागण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत.
नेमकी हत्या कोणी केली हे आमच्या कुटुंबाला कोण सांगणार. राजकीय वैमनस्य होतं, असं सांगितलं जातं. तपास यंत्रणा दिरंगाई करतेय. हा तपास सीबीआयकडे वर्ग करावा ही मागणी केली होती, असे ओमराजे निंबाळकर यांनी सांगितले. महाराष्ट्र पोलिसांची तपास यंत्रणेवर विश्वास नव्हत म्हणून आम्ही सीबीआय तपासाची मागणी केली होती.
कलयुग आहे. 9 च्या 9 आरोपी निर्दोष असतील तर हत्या कोणी केली. सुरुवातीपासून तपास संशयास्पद आहे. सीबीआय तपासात 3 वर्षाचा कालावधी गेला. आम्ही उच्च न्यायालयात जाणार आहोत आणि तिथे दाद मागणार असल्याचे ओमराजे निंबाळकर म्हणाले. हा निकाल म्हणजे आमच्या कुटुंबासाठी महत्वपूर्ण होता. माझी राजकीय भूमिका मी सामान्य माणसांशी बोलून निर्णय जाहीर करणार आहे. 6 खासदारांचा गट असल्याच्या चर्चावर त्यांनी भाष्य केले. मी कार्यकर्त्यांशी बोलून माझा निर्णय घेईन. कोणी काय बोलायचं हे माझ्या हातात नाही. मी सामान्यांशी बोलून निर्णय घेईन. निकाल लागल्यावर मी निर्णय घेईन. मला निर्णय घ्यायचा असता तर 2022 मध्येच निर्णय घेतला असता, असे निंबाळकर म्हणाले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.