महिला पोलिसाकडे शरीरसुखाची मागणी केल्याचा पीएसआयवर आरोप
माजी खासदार उन्मेश पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल
जळगाव : खरा पंचनामा
चाळीसगाव येथील पोलीस उपनिरीक्षक महिला पोलिसाकडे शरीरसुखाची मागणी करत असल्याचा आरोप केल्याने माजी खासदार उन्मेश पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडवून देणारी घटना समोर आली आहे. जळगावचे माजी खासदार आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते उन्मेश पाटील यांच्याविरोधात चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक संदीप घुले यांच्याविषयी जाहीर भाषणात आक्षेपार्ह वक्तव्य, बदनामीकारक आरोप आणि शिवीगाळ केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.
२८ जून रोजी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याबाहेर एका प्रकरणाच्या निषेधार्थ धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले होते. या आंदोलनात उन्मेश पाटील सहभागी झाले होते. आंदोलकांना संबोधित करताना त्यांनी पोलीस उपनिरीक्षक संदीप घुले यांच्यावर गंभीर आरोप करत अपमानास्पद भाषा वापरल्याचा आरोप आहे.
भाषणादरम्यान उन्मेश पाटील यांनी पीएसआय घुले हे निष्पाप तरुणांविरोधात खोटे गुन्हे दाखल करून त्यांना त्रास देत असल्याचा आरोप केला. तसेच एका महिला पोलीस कर्मचाऱ्याकडे शरीरसुखाची मागणी केल्याचाही गंभीर आरोप त्यांनी केला. या वक्तव्यांचे काही व्हिडिओ सोशल मीडियावरही समोर आले आहेत.
या प्रकरणाची गंभीर दखल घेत चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याच्या गोपनीय शाखेतील एका पोलीस कर्मचाऱ्याने अधिकृत तक्रार दाखल केली. त्यानुसार भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३५२ आणि ३५६ (३) अंतर्गत उन्मेश पाटील यांच्याविरोधात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.