Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

वेदांत बंडगर हत्या प्रकरण दोषींवर ‘मकोका’ लावणारपालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती पहा व्हिडीओ

वेदांत बंडगर हत्या प्रकरण दोषींवर ‘मकोका’ लावणार
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती 
पहा व्हिडीओ 

सांगली : खरा पंचनामा 

निष्पाप वेदांत बंडगर याच्या हत्येची घटना अत्यंत गंभीर, दुर्दैवी आणि धक्कादायक असून या प्रकरणातील दोषींची गय केली जाणार नाही, अशी स्पष्ट आणि खंबीर भूमिका सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री ना. चंद्रकांतदादा पाटील यांनी घेतली आहे. या गुन्ह्यातील गांभीर्य लक्षात घेता आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकोका) अंतर्गत कारवाई सुरू करण्यात आली आहे.


मुख्य आरोपींना १८ जूनपर्यंत पोलीस कोठडी
या संवेदनशील प्रकरणाचा तपास पोलिसांनी वेगाने सुरू केला असून, गुन्ह्यातील मुख्य आरोपी निलेश गडदे आणि त्याचा साथीदार अतुल वायदंडे या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने त्यांना १८ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. याशिवाय, फिर्यादीत नमूद असलेल्या इतर तीन फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस यंत्रणा युद्धपातळीवर काम करत आहे.

तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे
 (LCB) वर्ग
घटनेचे गांभीर्य पाहून या प्रकरणाचा तपास आता स्थानिक गुन्हे शाखेकडे (LCB) वर्ग करण्यात आला असून, अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या थेट मार्गदर्शनाखाली हा तपास सुरू आहे. तसेच, जत पोलीस ठाण्यात यापूर्वी दाखल झालेल्या गुन्ह्यांचीही गंभीर दखल घेण्यात आली असून, संबंधित पोलीस निरीक्षकांचा प्राथमिक चौकशी अहवाल कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक यांच्याकडे सादर करण्यात आला आहे. सद्यस्थितीत संबंधित पोलीस निरीक्षकांना नियंत्रण कक्षाशी संलग्न करण्यात आले आहे.

या प्रकरणात कोणालाही अभय दिले जाणार नाही. तपासात समोर येणारी व्यक्ती कितीही प्रभावशाली अथवा कोणत्याही स्तरावरील असली, तरी त्याला कायद्याच्या चौकटीत आणले जाईल. निष्पक्ष आणि पारदर्शक तपासाद्वारे पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. — ना. चंद्रकांतदादा पाटील (पालकमंत्री, सांगली जिल्हा)

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.