Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

"ही लढाई इथेच संपत नाही..."

"ही लढाई इथेच संपत नाही..."

नवी दिल्ली : खरा पंचनामा 

शिक्षण व्यवस्थेतील कथित अनियमिततेविरोधात दिल्लीतील जंतर-मंतर येथे आंदोलन केल्यानंतर कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी केंद्र सरकारला सात दिवसांची मुदत दिली आहे.

केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा किंवा त्यांना पदावरून हटवावे, अन्यथा हे आंदोलन देशव्यापी करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला. "ही लढाई इथेच संपत नाही," असेही दिपके यांनी स्पष्ट केले.
आज सोशल मीडियावर पोस्ट करत दिपके यांनी आंदोलनात सहभागी झालेल्या सर्वांचे आभार मानले. त्यांनी या आंदोलनाला ऐतिहासिक आणि शांततापूर्ण लोकचळवळ असे म्हटले. त्यांनी म्हटले आहे की, काल आपल्यापैकी हजारो जणांनी इतिहास घडवला. जंतरमंतरवरील आपल्या शांततापूर्ण निदर्शनांनी सरकारला याची झलक दाखवून दिली की, जेव्हा आपण 'झुरळं' एकवटतो तेव्हा काय करू शकतो. अनेक जण प्रथमच आंदोलनात सहभागी झाले असून शिक्षण व्यवस्थेबाबतचा रोष व्यक्त करण्यासाठी ते रस्त्यावर उतरल्याचे त्यांनी सांगितले.

उन्हाच्या तडाख्याची पर्वा न करता सहभागी झालेल्या आणि शांततापूर्ण निदर्शने हीच आपली सर्वात मोठी ताकद आहे हे सिद्ध करणाऱ्या तुम्हा प्रत्येकाचे मी आभार मानतो. शांततापूर्ण चळवळीचे सरकार काहीही वाकडे करू शकत नाही.

आपल्यासारख्या 'झुरळांना' त्यांच्याकडून कधीही घाबरण्याची गरज नाही. पण हे प्रकरण इथेच संपत नाही. धर्मेंद्र प्रधान यांनी एका संपूर्ण पिढीवर अन्याय केला आहे. जर त्यांना पदावरून हटवले नाही किंवा त्यांनी स्वतःहून राजीनामा दिला नाही, तर आम्हाला आमचा लढा प्रत्यक्ष रस्त्यावर सुरू ठेवावा लागेल, असे दिपके यांनी म्हटले आहे.

CJP चे प्रवक्ते आशुतोष रंका शनिवारी आंदोलनानंतर म्हणाले की, "सरकारला आम्ही सात दिवसांचा अवधी देत आहोत. धर्मेंद्र प्रधान यांनी सन्मानाने राजीनामा द्यावा किंवा पंतप्रधानांनी त्यांना पदावरून दूर करावे. अन्यथा ही चळवळ देशभर विस्तारेल. देशाच्या शिक्षण व्यवस्थेत व्यापक बदल घडवून आणण्याची वेळ आली आहे आणि त्या बदलाची सुरुवात आजपासून झाली आहे," असेही रंका यांनी म्हटले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.