Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

आरळा येथे उद्या 'हिंदू जनआक्रोश मोर्चा'सकल हिंदू समाजाचे सहभागी होण्याचे आवाहन

आरळा येथे उद्या 'हिंदू जनआक्रोश मोर्चा'
सकल हिंदू समाजाचे सहभागी होण्याचे आवाहन

पूजा फडके 
सांगली : खरा पंचनामा 

हिंदुत्ववादी तरुण आणि ह.भ.प. अनिल देवळेकर महाराज यांच्यावर खोटी माहिती देऊन गुन्हे दाखल केल्याच्या निषेधार्थ उद्या, मंगळवार दिनांक ९ जून रोजी सकाळी ११ वाजता आरळा (ता. शिराळा, जि. सांगली) येथे भव्य 'हिंदू जनआक्रोश मोर्चा' आयोजित करण्यात आला आहे.

सकल हिंदू समाजाच्या वतीने काढण्यात येणारा हा मोर्चा अंबाजी चौक येथून निघणार असून, यामध्ये आमदार संग्रामभैय्या जगताप, डॉ. धवलसिंह मोहिते-पाटील आणि ह.भ.प. संग्रामबापू भंडारे प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. प्रशासकीय अन्यायाविरुद्ध काढण्यात येणाऱ्या या मोर्चामध्ये परिसरातील समस्त हिंदू बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.