पोलीस तपास कसा टाळायचा? गुगल सर्च हिस्टरीने उघड केला 'सिया-चेतन'चा क्रूर कट !
रायगड : खरा पंचनामा
केतन अग्रवाल 25 वर्षीय तरुण ज्याची लोहगडावरुन 350 फूट खाली ढकलून हत्या करण्यात आली. केतन अग्रवालची चूक एवढीच होती की, त्याने पालकांनी ठरवलेल्या मुलीशी लग्नाला होकार दिला होता. फेब्रुवारी महिन्यात केतन आणि सियाचा साखरपुडा झाला होता.
जुलै महिन्यात हे दोघे जयपुरमध्ये लग्नबंधनात अडकणार होते. पण त्या अगोदरच सिया आणि चेतनने त्याची हत्या केली. या प्रकरणात आता सिया आणि चेतनच्या मोबाईल फोनची तपासणी झाली आहे. ज्यामध्ये धक्कादायक माहिती समोर आली आहे.
हत्या अपघात कसा दाखवावा याचं गुगल सर्च सिया आणि चेतनने आपल्या मोबाईलवर केलं आहे. जेव्हा पोलिसांनी सिया आणि चेतनचे मोबाईल फोन तपासले, तेव्हा त्यांची गूगल सर्च हिस्ट्री पाहून त्यांना धक्काच बसला. त्यांनी गूगलवर 'खून ट्रेकिंग अपघातासारखा कसा दाखवायचा' इंग्रजीत सर्च केलं होतं How to make a murder look like a trekking accident) असे शोधले होते. सिया आणि चेतन यांनी खूप आधीपासून हत्येचा कट रचला होता. 18 जून अगोदर सिया आणि केतनने 14 जून रोजी केतनची हत्या करण्याचा प्रयत्न केला पण तो अयशस्वी ठरला.
सियाने या अगोदर खूप वेळा केतनच्या हत्येचा कट रचला होता. सिया आणि चेतनने हा कट 30 मेपासून रचला होता. सिया म्हणाली की, आपण लोहगडावरती फिरायला जाऊ आता लोहगड का निवडल गेलय हा खरा प्रश्न आहे कारण लोहगडावरती जाऊन हत्या करायची होतीय हे सिया आणि चेतनच मे महिन्यात ठरलेलं होतं आता लोहगड का निवडलं तर केतनला ट्रेकिंगची खूप आवड होती आणि हीच आवड जी आहे या आवडीचाच आपण फायदा घ्यायचा असं त्यांनी ठरवलं होतं.
लोहगडावर यानंतरही अनेकदा जाऊन सिया आणि चेतनने रेकी केली होती. लोहगडाचा कोणता कोपरा असा आहे जो निर्जन आहे. तसेच सियाने प्री वेडिंग पूर्वी देखील लोहगडला जाण्याचा प्लान केला. 6 जूनला सिया आणि केतन बालीला प्री वेडिंगला जाणार होते. मात्र त्याच्या पूर्वी म्हणजे 4 जूनला लोहगडावर जाण्याचा पुन्हा प्लान केला होता. पण आता आपल्याला प्री वेडिंगला जायचंय म्हणून त्याने टाळलं.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.