Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

मोदी मंत्रिमंडळात मोठ्या फेरबदलांची शक्यता ! १२ मंत्र्यांना डच्चू मिळण्याचा अंदाज

मोदी मंत्रिमंडळात मोठ्या फेरबदलांची शक्यता ! 
१२ मंत्र्यांना डच्चू मिळण्याचा अंदाज

नवी दिल्ली : खरा पंचनामा 

राज्यसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्रिमंडळात मोठे फेरबदल होणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत. यावेळी अनेक राज्यमंत्र्यांना बदलले जाऊ शकते, अशी जोरदार चर्चा आहे. येत्या १८ जूनला राज्यसभा निवडणुका पार पडतील त्यानंतर हे फेरबदल होऊ शकतात, असा अंदाज वर्तवला जात आहे. या फेरबदलात कोणत्या मंत्रालयांमध्ये मोठे बदल होतील हे अद्याप स्पष्ट नसले तरी, ही संख्या १२ मंत्र्यांपर्यंत पोहोचू शकते असे म्हटले जात आहे.

इंग्रजी वृत्तससमुह 'द न्यू इंडियन एक्सप्रेस'मधील एका वृत्तानुसार, उत्तर प्रदेशसह अनेक राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकांची तयारी करत असलेल्या भाजपकडून मंत्रिमंडळासाठी मोठे निर्णय घेतले जाऊ शकतात. किमान दोन कॅबिनेट मंत्री आणि तीन राज्यमंत्र्यांना मंत्रिमंडळातून हटवले जाऊ शकते. दक्षिणेकडील एका राज्यात पक्षाची सूत्रे एका ज्येष्ठ मंत्र्याच्या हाती दिली जाऊ शकतात, असाही अंदाज वर्तवला जात आहे.

अहवालानुसार, जेडी (यू), टीडीपी, एनसीपी आणि आरएलएम सारख्या मित्रपक्षांना मोदी सरकारच्या नवीन मंत्रिमंडळात स्थान मिळू शकते. याबाबतीत नितीश कुमार यांच्या जेडी (यू) आणि चंद्रबाबू नायडू यांच्या टीडीपीला सर्वाधिक फायदा होण्याची शक्यता आहे. मित्रपक्षांतील बहुतेक नेत्यांना राज्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे. अशीही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

याशिवाय, राज्यसभेतील आपला कार्यकाळ पूर्ण करणाऱ्या अनेक मंत्र्यांची यावर्षी किंवा २०२७ च्या सुरुवातीला बदल केले जाऊ शकतात. अहवालानुसार ७० वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या काही राज्यसभा खासदारांच्या बदलीचा विचार केला जाऊ शकतो, याशिवाय नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाऊ शकते. तसेच, भाजपच्या आघाडीच्या नेत्यांना पहिल्यांदाच मंत्रिमंडळात स्थान दिले जाऊ शकते.

अहवालानुसार, रेल्वे, वित्त, कॉर्पोरेट व्यवहार, कोळसा, वस्त्रोद्योग, माहिती आणि प्रसारण, इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी, ग्रामीण विकास, रसायने आणि खते, सहकारी संस्था, मत्स्यव्यवसाय, जलशक्ती, कृषी आणि पर्यावरण, कायदा आणि इतर मंत्रालयांमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

१८ जून रोजी होणाऱ्या निवडणुकांमध्ये आंध्र प्रदेश, गुजरात आणि कर्नाटक येथून प्रत्येकी चार जागा, मध्य प्रदेश आणि राजस्थान येथून प्रत्येकी तीन जागा, झारखंड येथून दोन जागा आणि मणिपूर, मेघालय, अरुणाचल प्रदेश आणि मिझोराम येथून प्रत्येकी एका जागेचा समावेश आहे. महाराष्ट्र आणि तामिळनाडू येथून प्रत्येकी एका राज्यसभा जागेसाठी पोटनिवडणूकही होणार आहे. ज्या २६ जागांसाठी निवडणुका आणि पोटनिवडणुका होत आहेत, त्यापैकी १८ जागा एनडीएकडे आणि १२ जागा भाजपकडे आहेत.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.