Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

खान सरांना अटक होण्याची शक्यतागोळीबार प्रकरणाला नवे वळण; बॉडीगार्डच्या चौकशीनंतर महत्त्वाचे धागेदोरे सापडले

खान सरांना अटक होण्याची शक्यता
गोळीबार प्रकरणाला नवे वळण; बॉडीगार्डच्या चौकशीनंतर महत्त्वाचे धागेदोरे सापडले

पटणा : खरा पंचनामा 

संपूर्ण देशभरात लोकप्रिय आणि प्रसिद्ध असलेले शिक्षक आणि यूट्यूब एज्युकेटर खान सर पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार त्यांच्या बॉडीगार्डची पटणा पोलिसांनी चौकशी केली असून या प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पटणा कोचिंग प्रकरण आणि गोळीबाराच्या घटनेनंतर खान सर उर्फ फैजल खान यांनाही अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यापूर्वी पटणा पोलिसांनी खान सर यांच्या दोन्ही सुरक्षा रक्षकांना ताब्यात घेत अटक केली आहे.

खान सर यांच्या सुरक्षा रक्षकांकडून कथितरित्या गोळीबार करण्यात आल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर पटणा पोलिसांनी मोठी कारवाई करत दोन्ही बॉडीगार्डना अटक केली. त्याचवेळी फैजल खान यांच्याबाबतही चौकशीची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

अटक करण्यात आलेल्या सुरक्षा रक्षकांची नावे प्रदीप आणि तालेश्वर अशी असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार दोघांकडून चौकशीदरम्यान काही महत्त्वाची माहिती मिळाल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान तपासाची व्याप्ती आणखी वाढवण्यात आली असून पोलिसांकडून खान सर यांचीही चौकशी केली जाऊ शकते, अशी माहिती समोर येत आहे. पोलिसांचे पथक त्यांच्या कोचिंग संस्थेत पोहोचूनही चौकशी करत असल्याचे सांगितले जात आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार अटक करण्यात आलेल्या दोन्ही सुरक्षा रक्षकांनी गोळीबाराच्या घटनेशी संबंधित काही बाबी मान्य केल्याचे समोर येत आहे. त्यामुळे या प्रकरणात खान सर यांच्या अडचणी वाढू शकतात, अशी चर्चा सुरू झाली आहे.

सूत्रांच्या म्हणण्यांनुसार पोलिस या संपूर्ण प्रकरणाची विविध अंगांनी चौकशी करत आहेत. बॉडीगार्डच्या चौकशीदरम्यान काही महत्त्वाची माहिती समोर आल्याचे सांगितले जात असले तरी याबाबत अद्याप अधिकृत पुष्टी करण्यात आलेली नाही. तपास यंत्रणा या प्रकरणाशी संबंधित सर्व पैलूंची सखोल चौकशी करत असून पटणा पोलिस लवकरच खान सर यांचीही चौकशी करू शकतात, अशी माहिती समोर येत आहे. या प्रकरणात पोलिसांकडून अद्याप अंतिम निष्कर्ष जाहीर करण्यात आलेला नसून तपास सुरू आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.