Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

निदा खान निघाली अत्यंत शातीर, ज्याने आसरा दिला त्यालाही फसवलं? MIM नगरसेवक मतीन पटेलांचा मोठा गौप्यस्फोट

निदा खान निघाली अत्यंत शातीर, ज्याने आसरा दिला त्यालाही फसवलं? 
MIM नगरसेवक मतीन पटेलांचा मोठा गौप्यस्फोट

नाशिक : खरा पंचनामा 

मागील काही दिवसांपासून नाशिक येथील टीसीएस कंपनीतील महिला लैंगिक अत्याचार आणि धर्मांतराचं प्रकरण चांगलंच गाजत आहे. या प्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपींसह निदा खानला अटक केली आहे. निदा खानवर कंपनीतील तरुणीचं धर्मांतरासाठी ब्रेन वॉशिंग केल्याचा आरोप आहे.

काही दिवसांपूर्वी संभाजीनगरमधून निदा खानला बेड्या ठोकल्या होत्या. ती एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल यांच्या मित्राच्या घरात वास्तव्याला होती. या प्रकरणी पोलिसांनी मतीन पटेल यांचीही कसून चौकशी केली आहे.

मात्र आता या प्रकरणात अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. निदा खानने मतीन पटेलला देखील फसवलं असल्याचं बोललं जात आहे. मतीन पटेल यांनी नुकतंच एका मराठी वृत्तपत्राला मुलाखत दिली आहे. यात त्यांनी याबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. निदा खानच्या कुटुंबीयांनी आपल्याला चुकीची माहिती सांगून मदत मागिल्याचा दावा मतीन पेटल यांनी केला आहे.

आरोपी निदा खानला आसरा का दिला? असा प्रश्न विचारला असता मतीन पटेल यांनी भुवया उंचावणारं उत्तर दिलं आहे. आपल्याला केवळ माणुसकी नडली असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. याबाबतचा घटनाक्रम सांगताना मतीन पटेल म्हणाले, काही दिवसांपूर्वी निदा खानचे वयोवृद्ध आई-वडील, मावशी आणि काही बुरखाधारी महिला आपल्या जनसंपर्क कार्यालयात आल्या होत्या. त्यांनी आपल्या कुटुंबातील एका महिलेची प्रसूतीची वेळ जवळ आल्याचं सांगितलं. तसेच दोन ते तीन दिवस आसरा द्यावा, अशी मदत मागितली.

आपल्या कार्यालयात दररोज शेकडो लोक येतात. त्यांच्या विविध समस्या असतात. लोकप्रतिनिधी म्हणून त्यांची समस्या आम्ही ऐकून घेत असतो. लागेल ती मदतही करत असतो. अशा स्थितीत निदा खानच्या कुटुंबीयांनी मदत मागितल्याने आपण आपला मित्र हनीफ खानला फोन केला आणि त्याचं रिकामं घर या कुटुंबासाठी राहण्यासाठी द्यावं, अशी विनंती केली. हनिफने देखील देखील माणुसकीच्या नात्याने चावी आणून दिली. यानंतर निदाच्या कुटुंबाला हे घर देण्यात आलं. मुळात निदा खान आपल्या कार्यालयात कधीही आली नव्हती, असा दावाही मतीन पटेल यांनी केला.

मतीन पटेल यांच्या या गौप्यस्फोटानंतर निदा खानने पटेल यांना अंधारात ठेवून त्यांची मदत घेतली होती का? असा प्रश्न निर्माण होत आहे. शिवाय ज्याने आसरा दिला, त्याला निदाने फसवलं का? असा संशय व्यक्त केला जात आहे. निदा खान सध्या न्यायालयीन कोठडीत असून तिने जामीन मिळवण्यासाठी अर्ज केला आहे. शिवाय ती काही महिन्यांची गरोदर देखील आहे. सध्या या प्रकरणाचा तपास नाशिक पोलीस करत आहेत.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.