Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

गेल्या 12 वर्षांत 116 पेपरफुटी, 7.5 कोटी मुलांच्या भविष्याच्या अन् स्वप्नाच्या चिंधड्या तब्बल 19 राज्यात पेपर माफियांचा हैदोस

गेल्या 12 वर्षांत 116 पेपरफुटी, 7.5 कोटी मुलांच्या भविष्याच्या अन् स्वप्नाच्या चिंधड्या 
तब्बल 19 राज्यात पेपर माफियांचा हैदोस

दिल्ली : खरा पंचनामा 

देशातील पेपरफुटी आता एका परीक्षेपुरती किंवा राज्यापुरती मर्यादित राहिलेली नाही. हे संपूर्ण देशभरात पसरलेले एक मोठे, संघटित जाळे बनले आहे. प्रसारमाध्यमांचे अहवाल आणि सरकारी कारवाईनुसार, 2014 जुलै 2026 पर्यंत किमान 116 पेपरफुटीची प्रकरणे नोंदवली गेली आहेत.

या प्रकरणांमुळे अंदाजे 7.5 कोटी उमेदवार प्रभावित झाले आणि हे पेपर माफियांचे जाळे 19 राज्यांमध्ये पसरलं आहे. 2014 ते 2024 दरम्यान 89 प्रकरणे नोंदवली गेली. या प्रकरणांमध्ये 21 केंद्रीय संस्था आणि 68 राज्यस्तरीय परीक्षांचा समावेश होता. त्यानंतर, 2025 मध्ये 20 पेपरफुटीची प्रकरणे नोंदवली गेली आणि जुलै 2026 पर्यंत NEET-UG सह 7 प्रकरणे नोंदवली गेली.

3 लाख सरकारी नोकऱ्या रखडल्या
जानेवारी 2019 ते जून 2024 दरम्यान, देशभरातील 19 राज्यांमधील 65 परीक्षांच्या प्रश्नपत्रिका फुटल्या. यामध्ये शासकीय भरती, प्रवेश, बोर्ड आणि विद्यापीठ परीक्षांचा समावेश आहे.
या 65 प्रकरणांपैकी 45 प्रकरणे शासकीय भरती परीक्षांशी संबंधित होती. पेपरफुटीमुळे किमान 27 परीक्षा रद्द किंवा पुढे ढकलण्यात आल्या.
यामुळे तीन लाखांहून अधिक शासकीय पदांवरील भरती ठप्प झाली. शिक्षक आणि पोलीस भरती परीक्षांना सर्वाधिक लक्ष्य करण्यात आले.
उत्तर प्रदेश 11 प्रकरणांसह यादीत अव्वल स्थानी होता. मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये प्रत्येकी नऊ, महाराष्ट्रात सहा आणि गुजरातमध्ये पाच प्रकरणे नोंदवली गेली.
एसएससी, केंद्रीय विद्यालय संघटन, यूपीएससी, आर्मी, ओएनजीसी आणि कृषी शास्त्रज्ञ भरती मंडळ यासह आठ केंद्रीय भरती परीक्षा रद्द कराव्या लागल्या.
यामुळे भरतीला दोन ते आठ महिन्यांचा विलंब झाला.
2025-26 मध्ये बोर्ड, भरती, पात्रता, विद्यापीठ आणि वैद्यकीय प्रवेश परीक्षांमध्ये पेपरफुटी सुरूच राहिली.

नीट पेपरफुटीनंतर विद्यार्थी आणि तरुणांमधील अनेक वर्षांचा संताप उफाळून आला. याविरोधात कॉकरोच जनता पार्टीच्या (सीजेपी) नेतृत्वाखाली जंतर मंतर येथे आंदोलन सुरू झाले. पेपरफुटीनंतर 21 विद्यार्थ्यांनी केलेल्या आत्महत्या आणि शिक्षण व्यवस्थेतील व्यत्ययामुळे शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत हे आंदोलन करण्यात आले. 36 दिवसांच्या आंदोलनानंतर, प्रधान यांनी 25 जुलै रोजी राजीनामा दिला.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.