पोलीस अधिकाऱ्याचा सहकारी महिला PSI वर अत्याचार
डोक्याला बंदूक लावली, अश्लील फोटो-व्हिडिओ काढले अन्...
लुधीयाना : खरा पंचनामा
पंजाबच्या लुधीयाना शहरात एका महिला पोलीस निरीक्षकाने तिच्याच सहकाऱ्यावर पोलीस उपनिरीक्षकावर लैंगिक अत्याचाराचा गंभीर आरोप केला आहे. आरोपी उप निरीक्षक साहिबमीत सिंह याच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पीडितेच्या तक्रारीनुसार, २०२३ मध्ये इन्स्टाग्रामवर दोघांची ओळख झाली. ही ओळख हळूहळू मैत्रीत रूपांतरित झाली. यानंतर आरोपीने तिला मुल्लांपूर येथील एका हॉटेलमध्ये जेवणासाठी बोलावले. तेथे शीतपेयातून गुंगीचे औषध पाजून तिला बेशुद्ध केले आणि बलात्कार केला. त्याचवेळी तिचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ काढले.
या सामग्रीच्या आधारे आरोपीने पीडितेला सतत ब्लॅकमेल केले. रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून वारंवार लैंगिक शोषण केले. या काळात महिला इन्स्पेक्टर गरोदर राहिली, परंतु आरोपीने तिला जबरदस्तीने तीन वेळा गर्भपात करायला भाग पाडले. तसेच दबाव आणि ब्लॅकमेल करून तिचा घटस्फोटही घडवून आणला. या धक्कादायक आरोपांमुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
पीडितेने दिलेल्या सविस्तर तक्रारीच्या आधारे आरोपीविरुद्ध विविध कलमांखाली गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे. खाकी वर्दीतील अधिकाऱ्याकडूनच अशी घटना घडल्याने संपूर्ण प्रकरणाने समाजात संताप निर्माण झाला आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.