12 लाखात सौदा, 5 लाख अॅडव्हान्स, MPSC चा पेपर कसा फुटला?
रोहित पवारांनी सगळंच सांगितलं
पुणे : खरा पंचनामा
नीट पेपर लीक प्रकरणामुळे संपूर्ण देशभर मोठं आंदोलन करण्यात आलं. लाखो विद्यार्थ्यांनी दिल्लीच्या जंतर मंतर वर येत आपल्या मागण्या मांडल्या. मोर्चे काढले. सलग महिनाभर चाललेल्या आंदोलनानंतर विद्यार्थ्यांच्या रोषापुढे सरकार झुकलं.
केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. यानंतर कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन मागे घेण्यात आलं. नीट पेपर लीकची घटना ताजी असताना आता महाराष्ट्रात एमपीएससीचा पेपर फुटल्याची माहिती समोर आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी आज पत्रकार परिषद घेत याबाबत मोठा खुलासा केला आहे. २२ मार्च रोजी राज्यात एमपीएससीकडून राज्य औषध निरीक्षकाची परीक्षा घेण्यात आली. याच परीक्षेचा पेपर दोन दिवस आधीच फुटल्याचा दावा करण्यात येत आहे. रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेत ही पेपरफूट नक्की कशी झाली? याचा सविस्तर खुलासा करण्यात आला आहे.
रोहित पवारांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार, नंदूरबार येथील कौटिल्य अकॅडमीमधून हा पेपर फुटला आहे. येथील पाटील नावाच्या व्यक्तीने हा पेपर फोडला. या क्लासकडून एका परीक्षार्थीच्या पालकाने पेपर विकत घेतला होता. यासाठी तब्बल १२ लाख मोजल्याचा आरोप आहे. यासाठी पाच लाख रुपये अॅडव्हान्स आणि परीक्षा झाल्यानंतर उर्वरित रक्कम द्यावी, असा सौदा झाल्याचा आरोप रोहित पवारांनी केला.
रोहित पवारांनी दिलेल्या माहितीनुसार, पेपर लीक करणाऱ्या व्यक्तीने परीक्षेच्या दोन दिवस आधी एका विद्यार्थ्याने परीक्षेचे प्रश्न दिले होते. १०० पैकी ९० प्रश्न वितरीत करण्यात आले होते. संबंधित व्यक्तीने व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून या प्रश्न पत्रिका पाठवल्या होत्या. मेसेज सीन केल्यानंतर ती व्यक्ती काही वेळाने तो मेसेज डिलिट करत होती. यामुळे पेपर विकत घेणाऱ्या विद्यार्थ्याने आपल्याकडे पुरावे राहावेत, यासाठी समोरून पाठवलेले पीडीएफ आपल्या एका मित्राला पाठवून ठेवले. हीच चूक संबंधित परीक्षार्थीला महागात पडली आणि पेपर फुटीचं हे प्रकरण समोर आल्याचं रोहित पवारांनी म्हटलं आहे.
एवढंच नव्हे तर राज्यातील एका नायब तहसील दारांची दोन्ही मुलंही या परीक्षेत चांगल्या गुणांनी पास झाल्याचं रोहित पवारांनी म्हटलं आहे. यात तहसील दाराच्या मुलाचा राज्यात १३ तर मुलीचा राज्यात १६ वा क्रमांक आल्याची माहिती पवार यांनी दिली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.