तुकाराम मुंढेंना धक्का ! दूध डेअरींवरील कारवाईला हायकोर्टाची स्थगिती, '14 दिवसांची मुदत...'
मुंबई : खरा पंचनामा
अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली सध्या राज्यभरात दुध भेसळीविरोधात मोहीम उघडण्यात आली. राज्यातील अनेक ठिकाणी दुधात भेसळ केली जात असल्याचं उघड झालं असून त्यांच्याविरोधात कारवाईचा बडगा उभारण्यात आला आहे. दूध डेअरींवरील कारवाईला अंतरिम स्थगिती दिली आहे. नियमाचं उल्लंघन करण्यात आल्याने ही स्थगिती देण्यात आली आहे.
दूध डेअरीची तपासणी केल्यानंतर जर त्याच्यात काही त्रुटी असतील तर त्या दूर करण्यासाठी संबंधित डेअरीला 14 दिवसांची मुदत देणं बंधनकारक आहे. एफडीए आयुक्तांच्या मार्गदर्शक तत्त्वांमध्येही याचा उल्लेख आहे. मात्र, ही मुदत न देताच परवाने निलंबित करण्याची कारवाई बेकायदा असल्याचा युक्तिवाद न्यायालयात करण्यात आला. डेअरी चालकांनी अनेक त्रुटी दूर केल्याचेही याचिकेत स्पष्ट केलं. प्राथमिक सुनावणीनंतर न्यायालयाने या निलंबन कारवाईला स्थगिती दिली आहे.
नवी मुंबईतील एका फाईव्ह स्टार हॉटेलवर अन्न व औषध प्रशासनाने (FDA) कारवाई केल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने नराजी व्यक्त केली होती. दरम्यान न्यायालयाने पुनर्तपसाणी करण्यास सांगितलं असता स्वयंपाकघरात अस्वच्छता आणि दुर्गंधी आढळून आली.
हॉटेलला कोणत्याही प्रकारचा अन्नविषयक व्यवसाय त्वरित थांबवण्यास सांगितल्याने हॉटेल बंद करण्यात आलं होतं. यानंतर हॉटेल व्यवस्थापनाने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. एफडीएने परवाना निलंबित करण्याची कारणं सांगितली नसून, बाजू मांडण्याची संधीही दिली नसल्याचा दावा हॉटेलकडून करण्यात आला होता.
दरम्यान गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी एफडीएच्या कारवायांवर भाष्य करताना भेसळ करणाऱ्यांविरोधात कडक कारवाईचं समर्थन केलं होतं. ते म्हणाले होते की, "एफडीएच्या कारवाया मोठ्या पद्धतीने झाल्या पाहिजेत. दुसरी गोष्ट कारवाया होत असताना आपण केंद्राच्या कायद्याची अंमलबजावणी करतो. या कायद्यामध्ये बदल केले पाहिजेत असं आम्ही केंद्र सरकारला कळवलं आहे. आपण जोपर्यंत कडक नियम करत नाहीत तोपर्यंत वारंवार जे लोक सापडत आहेत त्यांना खऱ्या अर्थाने शिक्षा होणार नाही. त्याकरता आम्ही पाठपुरावा करत आहोत. मुख्यमंत्री पण यावर लक्ष ठेवून आहेत. जे कोणी भेसळ करत असतील त्यांच्यावर कडक कारवाई व्हावी असे आमचे प्रयत्न आहेत".
तुकाराम मुंढे यांनी दूध भेसळ आणि बनावट दूध रॅकेटविरुद्ध राज्यभर मोठी धडक मोहीम राबवली आहे. या कारवाईत राज्यभरात शेकडो छापे टाकून कोट्यवधींचे भेसळयुक्त दूध जप्त करण्यात आले आणि अनेक गुन्हे दाखल झाले. त्यांच्या या कामगिरीचे आणि प्रामाणिक कार्यपद्धतीचे कौतुक करण्यासाठी बदलापुरातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन तुकाराम मुंढे यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घातला होता.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.