पोलिस चौकीत सुरू होता 20 लाखांचा डाव ? नन्हे दरोड्याचं रहस्य उलगडलं; २ पोलिस अन् पत्रकार जाळ्यात
खेड शिवापूर : खरा पंचनामा
नरहे येथील एक कोटी रुपये दरोड्याच्या कटात तोतया पत्रकार आशिष तिवारी आणि राजगड पोलिस ठाण्यातील महिला पोलिस कर्मचारी प्रमिला निकम आणि अजीज मेस्त्री यांचा सहभाग उघड झाला आहे. तिवारी याला पुणे पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. तर निकम आणि मेस्त्री फरार असून त्यांचा शोध पोलिस घेत आहेत. या प्रकरणाने पुणे ग्रामीण पोलिस दलात एकच खळबळ उडाली आहे.
सुमारे आठ दिवसांपूर्वी नरहे येथे एका व्यावसायिकाची एक कोटीची लूट करण्यात आली होती. ही लूट करताना रोकड असलेली मोटारगाडी घेऊन आरोपी हे नरहे येथून थेट खेड शिवापूर पोलिस चौकीत दाखल झाले होते. मुळात लुटीची रोकड असलेली मोटार गाडी घेऊन आरोपी खेड शिवापूर पोलिस चौकीत कसे आले? या प्रश्नाने या सगळ्या प्रकरणात संशय निर्माण झाला होता.
ही रोकड खेड शिवापूर पोलिस चौकीत आणल्यानंतर तोतया पत्रकार आशिष तिवारी, महिला पोलिस कर्मचारी प्रमिला निकम, अजित मेस्त्री आणि इतर दोन जण यांचा त्यातील 20 लाख रुपये रक्कमेचा बेकायदेशीर आर्थिक लाभ मिळवण्याकरता बेकायदेशीर विल्हेवाट प्रयत्न सुरु होता. चौकीत सुरु असलेला हा प्रकार लक्षात येताच राजगडचे पोलिस निरीक्षक संतोष जाधव तातडीने खेड शिवापूर पोलिस चौकीला आले.
त्यांनी हा चुकीचा प्रकार लक्षात येताच ती रोकड आणि आरोपी ताब्यात घेऊन त्यांना नरहे पोलिसांच्या स्वाधीन केले होते. ही रोकड बेकायदा विल्हेवाट लावण्याचा हा प्रकार चौकीशेजारी असलेल्या काही हॉटेलच्या सीसीटीव्हीत कैद झाला होता. हे सीसीटीव्ही फुटेज आणि तसेच खेड शिवापूर पोलिस चौकीत पोलिस कर्मचारी, तोतया पत्रकार आणि इतर दोन जण यांनी ती पोलिस कर्मचारी, तोतया पत्रकार आणि इतर दोन जण यांनी ती रक्कम हाताळल्याबाबतचा गोपनीय अहवाल जाधव यांनी पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक संदीप सिंह गिल यांना पाठवला होता.
नरहे पोलिसांच्या तपासानुसार तोतया पत्रकार तिवारी, महिला पोलिस कर्मचारी निकम, मेस्त्री आणि इतर दोन जण यांचा या गुह्यात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यानुसार या गुह्यात तिवारी, निकम, मेस्त्री आणि इतर दोन जणांना सहआरोपी करण्यात आले आहे. त्यापैकी तिवारी याला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. तर इतर आरोपी फरारी आहेत. याप्रकरणी एकूण दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.