Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

प्रधानांचा राजीनामा, भाजप खासदाराच्या कन्येची आनंदात इन्स्टा पोस्टडिलीट करण्याची सूचना मिळताच म्हणाली, आता आईला फोन करतील

प्रधानांचा राजीनामा, भाजप खासदाराच्या कन्येची आनंदात इन्स्टा पोस्ट
डिलीट करण्याची सूचना मिळताच म्हणाली, आता आईला फोन करतील

भुवनेश्वर : खरा पंचनामा 

भुवनेश्वरच्या भाजपच्या खासदार अपराजिता सारंगी यांची कन्या अर्चिता सचिन राहर हिने धर्मेंद्र प्रधान यांनी दिलेल्या केंद्रीय शिक्षण मंत्रिपदाच्या राजीनाम्याचा आनंद साजरा करणारी एक पोस्ट सोशल मीडियावर प्रसारित केली. त्यामुळे ओडिशा भाजपमध्ये नाराजी पसरली आहे.

अर्चिताने इन्स्टाग्रामवरील एका पोस्टमध्ये राष्ट्रध्वजाच्या पार्श्वभूमीवर धर्मेंद्र प्रधान यांचे छायाचित्र टाकत, 'नीट पेपरफुटी प्रकरणावरुन झालेल्या मोठ्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा', असे लिहिले आहे. दुसरीकडे, तिच्या आईसह राज्यातील भाजप नेत्यांनी या प्रकरणी प्रधान यांची पाठराखण केली.

'प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे. अर्चिता आपल्या वक्तव्यावर ठाम आहे. ती जेन झीचे प्रतिनिधित्व करते व तिने आपले मत मांडले', असे अपराजिता यांच्या कार्यालयातील सहायक धनेश्वर बारिक यांनी सांगितले. 'या पोस्टमुळे अपराजिता अडचणीत आल्या आहेत का', असे विचारले असता, 'हे तर येणारा काळच ठरवेल', असे ते म्हणाले.

भुवनेश्वर येथून दोनवेळा खासदार म्हणून निवडून आलेल्या अपराजिता सारंगी यांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला असता त्या उपलब्ध झाल्या नाहीत. धर्मेंद्र प्रधान यांच्या कार्यालयातून दूरध्वनी आल्यानंतर अपराजिता यांनी आपल्या कन्येला ती पोस्ट हटवण्यास सांगितले होते.

अर्चिताने अन्य एका पोस्टद्वारे आपला पवित्रा स्पष्ट केला. 'ही पोस्ट डीपी (धर्मेंद्र प्रधान) यांच्या पीएसाठी आहे. ते माझ्या आईला फोन करून माझी पोस्ट हटवण्याची सूचना करतील. (असे यापूर्वीही घडले आहे) मात्र त्रास करून घेऊ नका. मी माझी पोस्ट मागे घेणार नाही. जय जगन्नाथ! जय हिंद,' असे तिने लिहिले.

अपराजिता यांनी शनिवारी रात्री एका एक्स पोस्टमध्ये लिहिले होते, 'श्री धर्मेंद्र प्रधान जी यांनी आज राजीनामा सादर केला आहे. नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा देण्यासाठी खूप धैर्य लागते. या अतिशय कठीण काळात मी त्यांच्या पाठीशी आहे. त्यांच्यावर भगवान जगन्नाथांचा आशीर्वाद राहो', असे त्यांनी लिहिले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.