धनादेश न वटल्याबद्दल साताऱ्यातील एकास शिक्षा व दंड
सांगली : खरा पंचनामा
न वठणारा धनादेश देऊन फसवणूक केल्याबद्दल सुरेश वामन जमदाडे (रा. सातारा) यांना २ महिने सश्रम कारावास व धनादेशची रक्कम रुपये ६,४०,०००/- वर ९% व्याज अशी दंडाची शिक्षा सांगली येथील मुख्य न्यायदंडाधिकारी ए. आर. कल्हापुरे यांनी सुनावली. फिर्यादीतर्फे सोनेचा & असोशिएट्स तर्फे अॅड. रुचिका पाटील, अॅड. मृणाल कुलकर्णी व अॅड. मिसबा शेख यांनी काम पाहिले.
फिर्यादी अमोल धोतरे & असोशिएट्स व सुरेश वामन जमदाडे यांचा मुलगा अक्षय सुरेश जमदाडे यांच्यात वाहने भाडे करारावर देण्याचा करार झाला होता. करारपत्राद्वारे ठरलेली भाडे रक्कम अक्षय सुरेश जमदाडे याने अमोल धोतरे & असोशिएट्स यांना न दिल्यामुळे भाड्याच्या थकीत रकमेकरिता अक्षय जमदाडे याच्या वतीने सुरेश वामन जमदाडे याने अमोल धोतरे & असोशिएट्स यांना त्यांच्या बँक खात्यावरील रक्कम रुपये ६,४०,०००/- चा धनादेश दिला होता. सुरेश वामन जमदाडे यांचे बँक खाते ब्लॉक असल्याच्या कारणावरून तो चनादेश न वठता परत आला. म्हणून अमोल धोतरे & असोशिएट्स यांनी सांगली येथील न्यायालयात खटला दाखल केला होता.
या खटल्यात एकूण २ साक्षीदार तपासण्यात आले. उपलब्ध पुरावा ग्राह्य धरून न्यायालयाने सुरेश वामन जमदाडे यांना शिक्षा व दंड ठोठावला.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.