सांगलीतील भिकाऱ्याच्या घरातच सापडला सोन्याचा डोंगर, किंमत 54 कोटी
गुवाहाटी : खरा पंचनामा
भिकारी बनून सर्वांच्या डोळ्यात धूळफेक करणारा एक व्यक्ती मोठा खिलाडी असल्याचं समोर आलं आहे. या भिकाऱ्याने आसाममध्ये एक घर खरेदी केलं होतं. या घरात तो सोनं लपवून ठेवायचा. आसाम पोलिसांनी त्याच्या घरावर छापा मारला तेव्हा फक्त चक्कर यायचीच बाकी राहिली.
या घरात सोन्याचा डोंगरच सापडला. प्रचंड सोनं आणि चांदी सापडली. पोलिसांनी हा सर्व माल जप्त केला असून या भिकाऱ्यालाही ताब्यात घेतलं आहे. या भिकाऱ्याचे थेट महाराष्ट्राशी कनेक्शन असल्याचं समोर आलं आहे.
पोलिसांनी या भिकाऱ्याच्या गुवाहाटीतील घरी छापा मारला. तेव्हा त्यांना 37.064 किलो सोनं सापडलं. या सोन्याची किंमत 54 कोटी इतकी आहे. पूर्वोत्तर भारतात एवढ्या मोठ्या प्रमाणावर सोनं सापडण्याची इतिहासातील ही पहिलीच वेळ आहे. आरोपी भिकाऱ्याचं नाव अक्षय परशुराम बनसोडे आहे. तो महाराष्ट्रातील सांगलीचा राहणारा असल्याचं पोलिसांनी सांगितलं.
गुवाहाटी पोलीस कमिश्नरेटच्या स्पेशल ऑपरेशन ग्रुप आणि लतासिल पोलीस ठाण्याने गुवाहाटीच्या खारघुली येथील एका घरात संयुक्त छापा मारला. या छापेमारीत घरातून 37.064 किलो सोन्याच्या विटांचे तुकडे मिळाले. पोलिसांच्या मते, या संपूरअण सोन्याची किंमत 54 कोटी आहे. छापेमारीत 13 ग्रॅम चांदीचे तुकडेही सापडले आहेत. चार मोबाईल फोन, 3755 रुपये रोख रक्कम आणि सोनं लपवण्यासाठी वापरण्यात आलेल्या बॅगाही सापडल्या आहेत.
अक्षय परशुराम बनसोडे (वय 32) हा महाराष्ट्रातील सांगलीचा राहणारा आहे. त्याने गुवाहाटीच्या गांधी बस्ती परिसरात एक घर भाड्याने घेतलं होतं. पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता धक्कादायक माहिती समोर आली आहे. शहरातील लोकांना संशय येऊ नये म्हणून तो दिव्यांग भिकारी बनून फिरत होता. तो आसाममध्ये म्यानमार मार्गे सोन्याची तस्करी करायचा, अशी माहिती पोलिसांनी दिली.
29 जून रोजी ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी या सोन्याचा तपास केला असता हे 24 कॅरेट शुद्ध सोनं आहे. आसाम पोलिसांच्या इतिहासातील ही सर्वात मोठी कारवाई आहे. मीडिल ईस्ट, म्यानमार आणि भारतातील अनेक शहरातील आंतरराष्ट्रीय सोने तस्करीच्या नेटवर्कशी यांचे संबंध असल्याचं चौकशीतून उघड झालं आहे. या नेटवर्कमध्ये कोण कोण आहेत याचा पोलीस तपास करत आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.