Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

राज्य उत्पादन शुल्क विभागातील अधीक्षक आणि उप अधीक्षकांच्या नियतकालिक बदल्यांचे आदेश जारी!विश्वजित देशमुख सांगलीचे तर प्रदीप पोटे जळगावचे अधीक्षक

राज्य उत्पादन शुल्क विभागातील अधीक्षक आणि उप अधीक्षकांच्या नियतकालिक बदल्यांचे आदेश जारी!
विश्वजित देशमुख सांगलीचे तर प्रदीप पोटे जळगावचे अधीक्षक 

पूजा फडके 
मुंबई : खरा पंचनामा 

महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने ३० जून २०२६ रोजी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेत राज्य उत्पादन शुल्क विभागातील (Excise Department) 'गट-अ' आणि 'गट-ब' संवर्गातील अधिकाऱ्यांच्या नियतकालिक बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. राज्यपाल यांच्या आदेशानुसार गृह विभागाचे उप सचिव रविंद्र औटे यांच्या स्वाक्षरीने हे आदेश काढण्यात आले आहेत.

महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम, २००५ मधील तरतुदींनुसार सक्षम प्राधिकाऱ्यांच्या मान्यतेने या बदल्या करण्यात आल्या आहेत.

बदली झालेल्या अधिकाऱ्यांची यादी खालीलप्रमाणे आहे:
अधीक्षक (गट-अ) बदल्यांची यादी:
नितीन घुले : अधीक्षक, मुंबई उपनगर-१ ते अधीक्षक, अहिल्यानगर-१ 
रविकिरण कोले : अधीक्षक, रायगड ते अधीक्षक, पुणे-२ 
प्रमोद सोनोने : अधीक्षक, अहिल्यानगर-१ ते अधीक्षक, यवतमाळ 
केशव राऊत : अधीक्षक, लातूर ते अधीक्षक, नंदुरबार 
श्रीम. स्नेहा सराफ : अधीक्षक, नंदुरबार अधीक्षक, ते मुंबई उपनगर-१ 
नितेश शेंडे : अधीक्षक, यवतमाळ ते अधीक्षक, बीड 
विश्वजित देशमुख : अधीक्षक, बीड ते अधीक्षक, सांगली 
प्रदिप पोटे : अधीक्षक, सांगली ते अधीक्षक, जळगाव 

उप अधीक्षक (गट-ब) बदल्यांची यादी:
संतोष बी. जगदाळे : उप अधीक्षक-१, पुणे-१  ते उप अधीक्षक, रायगड 
मनोज बी. चव्हाण : उप अधीक्षक-१, मुंबई उपनगर-२ ते उप अधीक्षक, मुंबई शहर 

संबंधित सर्व अधिकाऱ्यांना नवीन पदाचा पदभार तातडीने स्वीकारून त्याचा अहवाल आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क यांच्यामार्फत शासनास सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दिलेल्या पदग्रहण अवधीत बदलीच्या ठिकाणी रुजू न झाल्यास, संबंधित अधिकाऱ्याचा अनुपस्थितीचा कालावधी 'अकार्यदिन' म्हणून गणला जाईल. राज्य उत्पादन शुल्क आयुक्तांना स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत की, शासनाच्या पूर्वपरवानगीशिवाय कोणत्याही अधिकाऱ्याची रजा मंजूर करू नये. जर कोणत्याही अधिकाऱ्याने या बदली आदेशात बदल करण्यासाठी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे राजकीय अथवा इतर दबाव आणण्याचा प्रयत्न केला, तर ती महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम, १९७९ चे उल्लंघन मानून त्यांच्यावर कडक शिस्तभंगविषयक कारवाई केली जाईल.

हे सर्व आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करण्यात आले असून महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले आहेत.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.