सततच्या मुसळधार पावसामुळे चांदोली धरण निम्मे भरले
सांगली : खरा पंचनामा
पश्चिम महाराष्ट्रातील धरण क्षेत्रांमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे जलाशयांच्या जलपातळीत झपाट्याने वाढ होत आहे. यामध्ये शिराळा तालुक्यातील चांदोली धरण (वारणा जलाशय) आता जवळजवळ ५०% (निम्मे) भरले आहे.
धरण क्षेत्रात जोरदार पाऊस असून पाथरी आणि पाथरपुंज परिसरात अतिवृष्टी झाली, २४ तासांत २०० मिमीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. यामुळे धरणात पाण्याचा येवा मोठ्या प्रमाणावर वाढला आहे.
धरणाची पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाकडून वारणा नदीपात्रात १०० क्युसेक वेगाने नियंत्रित विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
नदीची पाणी पातळी वाढल्यामुळे कोकण-कोकरूड दरम्यानचे काही कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे आणि पूल पाण्याखाली गेले आहेत. सुरक्षेचा उपाय म्हणून प्रशासनाने या मार्गावरील वाहतूक तात्पुरती बंद केली आहे.
सखल भागात काही प्रमाणात संपर्क तुटला असला, तरी या मुसळधार पावसामुळे भात शेतीच्या कामांना वेग आला असून परिसरातील शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.